एक्स्प्लोर

Congress Chintan Shibir : राहुल गांधी यांनीच काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं, चिंतन शिबिरात काही नेत्यांची मागणी

दयपूरमध्ये काँग्रसचे चिंतन शिबिर सुरु आहे. या शिबिरात राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे.

Rahul Gandhi : सध्या उदयपूरमध्ये काँग्रसचे चिंतन शिबिर सुरु आहे. या शिबिरात काल दिवसभरात विविध मुद्यांवर चर्चा झाली. पण काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीत. पण राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी यावेळी काही नेत्यांनी केली आहे. तसेच सक्रिय असणाऱ्या नेत्याकडेच काँग्रसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. 

काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उदयपूर चिंतन शिबिरात काँग्रेस अध्यक्षाबाबत औपचारिक चर्चा झाली नसून, पक्षनेतृत्वात स्पष्टता हवी, अशी मागणी नेत्यांकडून होत आहे. यावेळी राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व बैठकांमध्ये राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या झालेल्या बैठकीत राहुल यांनी याबाबत आपण गांभीर्याने विचार करत असल्याचे नेत्यांना सांगितले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. 

काँग्रेसच्या या शिबिरामध्ये कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. या शिबिरात विविध समित्यांच्या बैठका पार पडणार आहेत. या समित्यांच्या बैठकांवेळी प्रत्येकाला आपापले मोबाईल बाहेर लॉकअपमध्ये ठेवून जायला सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या चिंतन शिबिरामध्ये ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुजरातमधील नेते हार्दिक पटेल उपस्थित नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये राहुल यांची मोठी भूमिका 

राहुल गांधी यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तरीदेखील मोदी सरकारविरोधात केवळ ट्विटरवर सक्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर बोलताना टी प्रतापन म्हणाले की, पक्षाध्यक्षांनी नियमितपणे सक्रिय रहायला हवं.

राहुल गांधींच्या दौऱ्यांवर टीका 

महत्त्वाच्या वेळी परदेश दौऱ्यावर गेल्याने राहुल गांधींवर टीका होत आहे. तसेच त्यांच्या नुकत्याच झालेल्या नेपाळ दौऱ्याबाबत, विविध प्रश्न उपस्थित केले गेले. दरम्यान, काँग्रेसच्या सुरु असलेल्या चिंतन शिबिरात मोठ्या बदलांबाबत चर्चा होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच काही नेत्यांच्या मागणीप्रमाणे राहुल गांधी पुन्हा काँग्रसचे अध्यक्ष होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 20 April 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6:30 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Embed widget