Ram Mandir : लोकार्पण सोहळ्याला काँग्रेसची पाठ? निमंत्रण असून अयोध्येत हजर न राहण्याचा पक्षाचा निर्णय : सूत्र
Congress : 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पण या सोहळ्याला काँग्रेस पक्ष हजर राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
![Ram Mandir : लोकार्पण सोहळ्याला काँग्रेसची पाठ? निमंत्रण असून अयोध्येत हजर न राहण्याचा पक्षाचा निर्णय : सूत्र Congress party will not attend the ceremony of Shri Ram Mandir in Ayodhya Sonia Gandhi, Rahul Gandhi and Mallakarjun Kharge were invited detail marathi news Ram Mandir : लोकार्पण सोहळ्याला काँग्रेसची पाठ? निमंत्रण असून अयोध्येत हजर न राहण्याचा पक्षाचा निर्णय : सूत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/05/d8714577b9378ef81a42fec2af36c6b61704418722291265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षाला श्रीराम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण असूनही हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीये. सोनिया गांधी (Soniya Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लकार्जुन खरगे यांना निमंत्रण देण्यात आले होते. पण तरीही लोकार्पण सोहळ्याला ते हजर राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये अयोध्येतील (Ayodhya) श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडेल. त्यामुळे लोकार्पण सोहळ्याआधीच काँग्रेसच्या या निर्णयाचे काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाकरता महाराष्ट्रातून सात पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
कोण जाणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला?
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.आता कोण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार याची उत्सुकता लागली आहे. शरद पवारांनी मी राम मंदिरात गर्दीत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आता अजित पवार काय भुमिका घेणार? ठाकरे बंधूपैकी कोण जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अयोध्येमध्ये रेल्वे स्थानक आणि विमानतळाचं ही उद्घाटन करण्यात आलं आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)