एक्स्प्लोर

Rahul Gandhi : काँग्रेसची भारत जोडण्याची तर भाजपची देश तोडण्याची विचारधारा, राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi : एकीकडं काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडं भाजप आणि RSS ची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं.

Rahul Gandhi : देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडं काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडं भाजप आणि RSS ची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. भारताला तोडण्याचे काम भाजप करत असल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केला. आज पाटण्यात (Patna) भाजपविरोधी 23 पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी राहुल गांधी पाटण्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 

BJP : भाजपकडून भारत तोडण्याचे काम सुरु

काँग्रेस पार्टीचा डीएनए हा बिहारमध्ये आहे. भाजर जोडो यात्रेत बिहारच्या जनतेनं खूप मदत केल्याचे राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रा सुरु असताना प्रत्येक राज्यात बिहारचे लोक आमच्यासोबत होते. काँग्रेसच्या विचारधारेला बिहारचे लोक मानत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. भाजपकडून भारत तोडण्याचे काम सुरु आहे. देशात द्वेष आणि हिंसा पसरवण्याचे काम भाजपकडून सुरु असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस जोडण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले. 

तेलंगणा, मध्ये प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस विजयी होणार

पाटण्यात आज देशातील सर्व विरोधी पक्षांचे नेते आले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन भाजपला हरवणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तेलंगणा, मध्ये प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजप दिसणार नाही. तिथे फक्त काँग्रेस विजयी होईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेस गरिबांबरोबर उभी आहे. देशातील दोन ते तीन लोकांना फायदा पोहोचवणे हेच भाजपचे काम असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशातील संपत्ती त्यांना देण्याचा भाजपचा उद्देश आहे. तर गरीबांचे काम करणं, त्यांच्या बाजूनं  उभं राहणं हा काँग्रेसचा उद्देश असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक

बिहारची राजधानी असलेल्या पाटणा इथं आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. भाजपविरोधातले 23 पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांनी या बैठकीचे आयोजन केलं आहे.  या बैठकीसाठी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्रातून देखील शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच इतर नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं हे सर्व विरोधी पक्ष आज पाटण्याच्या मंचावरुन काही घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Opposition Meeting : भाजपविरोधी पक्षांची पाटणात आज बैठक, देशातील बडे नेते उपस्थित राहणार; विरोधकांच्या घोषणेकडं देशाचं लक्ष 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget