एक्स्प्लोर

2019 ला मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या हातात ब्रम्हास्त्र?

2014 ला भाजपच्या विजयात सोशल मीडियाचा महत्त्वाचा वाटा होता. हे ओळखून काँग्रसनेही तेच धोरण अवलंबलं आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेस कॅम्ब्रिज अॅनालिटिका या प्रसिद्ध कंपनीच्या संपर्कात आहे. याच कंपनीने गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती. कॅम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीकडून ग्राहकांच्या इंटरनेट डेटाचं विश्लेषण केलं जातं. यावरुन लोकांच्या आवडी-निवडी, जिव्हाळ्याचे विषय लक्षात घेऊन रणनिती तयार केली जाते. या विश्लेषणात ऑनलाईन सर्चिंग, ई-मेल आणि शॉपिंग वेबसाईट्सही चाळल्या जातात. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलं आहे. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशात सोशल मीडियाचा महत्त्वाचा वाटा होता. सोशल मीडियाचा ग्रामीण भागाशी संबंध नाही, असं म्हणून त्यावेळी अनेक पक्षांनी सोशल मीडियाला प्राधान्य दिलं नाही. मात्र भाजपच्या विजयात सोशल मीडियाचीच भूमिका महत्त्वाची असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता काँग्रेसनेही भाजपच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. कॅम्ब्रिज अॅनालिटिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर निक्स यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीएची रणनिती आखण्यासाठी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्याचं वृत्त आहे. मतदारांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडून धोरण कसं आखता येऊ शकतं, याबाबत कंपनीने काँग्रेससमोर एक सादरीकरण केलं असल्याची माहिती आहे. जगातील अनेक पक्ष कॅम्ब्रिज अॅनालिटिकाच्या संपर्कात आहेत. केवळ अमेरिकेतच नाही तर ब्रेक्झिटच्या वेळीही कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची रणनिती आखणारी ही कंपनी आता काँग्रेसच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिंदीमध्ये जाहिराती करण्यात आल्या. व्हर्जिनियातील मंदिरात ट्रम्प यांच्या मुलीने दिवाळी साजरी केली. ही सर्व रणनिती कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने आखल्याचं बोललं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 
सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल

Embed widget