एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'काँग्रेस आजारी आहे', प्रिया दत्त यांचा पक्षाला घरचा आहेर
मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाल्यानंतर, पक्षातीलच नेते नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यात आता काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्ता यांनीही उडी घेऊन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. प्रिया दत्त यांनी ट्विट करुन पक्ष विविध रोगांनी ग्रस्त असल्याचं म्हणलं आहे.
प्रिया दत्त यांनी आपल्या ट्विटमध्ये, ''काँग्रेस आजारी आहे, वारंवार आजारी पडतेय, पण त्या रोगांचा इलाजही काँग्रेसमध्येच आहे, काँग्रेसचा आजारही काँग्रेस मध्येच आहे तसंच इलाजही काँग्रेसमध्येच आहे,'' असं म्हणलं आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी वाताहत झाली असून, पाचपैकी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. तर गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये काँग्रेसने कडवी झुंज देऊनही सत्ता स्थापन करण्यात पक्षाला यश मिळालं नाही. दरम्यान, यावरुन गोव्यात काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीही चव्हाट्यावर आली आहे. दिग्विजय सिंह यांच्या धोरण दिरंगाईमुळे गोव्यात सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगल्याचं काँग्रेसच्या नवनिर्वाचित नाराज आमदारांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे, यातील काही आमदारांनी आपली नाराजी पक्षाकडे व्यक्त केली आहे. संबंधित बातम्या VIDEO: पणजी : गोव्यात सत्तेचं स्वप्न भंगल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं?Cong has shown repeatedly thatit suffers from an autoimmune disease Cong destroys Cong we need to be treated from within to be healthy again
— Priya Dutt (@PriyaDutt_INC) March 15, 2017
पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल
देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य
पंजाबचा विजय काँग्रेसचा की कॅप्टन अमरिंदर सिंहांचा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement