एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'भारतव्याप्त काश्मीर', दिग्विजय सिंहांचं वादग्रस्त वक्तव्य
भोपाळ : काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी काश्मीरला 'भारतव्याप्त काश्मीर' असा शब्द प्रयोग वापरला.
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे पाकव्याप्त काश्मीर प्रश्नावरून अभिनंदन करतानाच, ते या प्रश्नी अधिकच गंभीर असल्याचे सांगितले.
''मात्र, ते भारतमधील काश्मीरच्या जनतेशी संवाद साधण्यास तयार नाहीत. जर काश्मीरमधील जनतेच्या मनात विश्वास निर्माण करायची गरज असेल, तर पाकव्याप्त काश्मीर आणि भारतव्याप्त काश्मीरच्या जनतेशी संवाद साधण्याची गरज आहे,'' असे ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, या वक्तव्यातील चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर सारवासारव केली. आपल्याला भारतातील काश्मीरसंदर्भात पंतप्रधान गंभीर नाहीत. काश्मीर खोऱ्यातील जनतेची चिंता नाही. पण पाकव्याप्त काश्मीरची चिंता जास्त असल्याचे, ते म्हणाले.#WATCH: Digvijaya Singh addresses J&K as India occupied Kashmir, later clarifies that it's integral part of Indiahttps://t.co/6XC28a2q5T
— ANI (@ANI_news) August 18, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement