(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सम्मान के चक्कर में क्या से क्या हो गया देखते देखते', कॉंग्रेसची ज्योतिरादित्य शिंदेंवर टीका
बीजेपीच्या प्रशिक्षण शिबिरात व्यासपीठावर न बसता खाली बसलेला एक फोटो आणि गळ्यात फुलांची माळ घातलेला दुसरा फोटो, असे ज्योतिरादित्य शिंदेंचे दोन फोटो शेअर करत कॉंग्रेसनं त्यांच्यावर टीका केली आहे.
भोपाळ: सन्मान मिळवायच्या नादात 'क्या से क्या हो गये देखते देखते' अशा प्रकारची टीका कॉंग्रेसने मध्य प्रदेशचे भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदेंवर केली आहे. कॉंग्रेसने त्यांचे दोन फोटो सोशल मिडियावर शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधलाय.
राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. भोपाळ मध्ये गेल्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रशिक्षण शिबिरात हजेरी लावली. त्या कार्यक्रमात शिवराजसिंह चौहान आणि इतर भाजप नेते हजर होते. या दरम्यान ज्योतिरादित्य शिंदेंना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं नाही. ते व्यासपीठाच्या खाली एका खुर्चीवर बसल्याचा फोटो व्हायरल होत आहे. याच फोटोवरुन कॉंग्रेसनं आता त्यांच्यावर निशाणा साधलाय.
जागा दाखवून दिली ज्योतिरादित्य शिंदेंचा हा फोटो शेअर करत कॉंग्रेस प्रवक्ता नरेंद्र सलूजा यांनी एक ट्वीट केलंय. त्यांमध्ये त्यांनी लिहलंय की गडबड करणाऱ्यांना शिवराजसिंह चौहान सोडत नाहीत. ज्योतिरादित्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला, आता त्यांना थेट जमिनीवर आणलं गेलंय. कॉंग्रेसच्या व्यासपीठाला स्वत:ची जहागीर समजणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्यात आली आहे.
मामाजी की कल बाबई में कही गयी बात का मतलब आज समझ में आ गया।
मामा आजकल फ़ुल फार्म में है , गड़बड़ करने वालों को छोड़ नहीं रहे है। सिंधिया जी ने गड़बड़ की , दबाव बनाया तो ज़मीन पर ला दिया। वाह मामा वाह ,कांग्रेस में जो मंच को अपनी जागीर समझते थे , उनको आज ज़मीन व औक़ात दिखा दी ? pic.twitter.com/8zba7Tfja3 — Narendra Saluja (@NarendraSaluja) December 26, 2020
एका माळेनं स्वागत कॉंग्रेसनं ज्योतिरादित्य शिंदेंचा आणखी एक फोटा सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्यावर टीका केलीय. या फोटोत ज्योतिरादित्य शिंदेंच्या गळ्यात एक माळ दिसत आहे. यावर कॉंग्रेसनं म्हटलंय की, "फुलाच्या एका माळेनं भव्य स्वागत करण्यात आलंय. सन्मान मिळवायच्या नादात बघता-बघता हे काय झालं"
गेंदे के फूल की एक माला से भव्य स्वागत, —सम्मान के चक्कर में क्या से क्या हो गया देखते देखते..! pic.twitter.com/FkiLMhuEky
— MP Congress (@INCMP) December 27, 2020
कॉंगेसच्या या टीकेवर अद्याप ज्योतिरादित्य वा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
महत्वाच्या बातम्या: