एक्स्प्लोर
स्मृती इराणींचा व्हिडिओ दाखवल्याने शाळेविरोधात पोलिसात तक्रार
लखनौ : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्स सेशन दाखवल्यामुळे उत्तर प्रदेशातील एक खाजगी शाळा अडचणीत आली आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार शाळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रिटर्निंग ऑफिसर (आरओ/निवडणूक अधिकारी) च्या परवानगीशिवाय स्मृती इराणींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सची चित्रफीत दाखवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. क्रांती कपूर कन्या इंटर कॉलेजमध्ये 'उडान' या स्मृती इराणींचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचं टेलिकास्ट भाजप नेते सुरज पाल शर्मा यांनी आयोजित केलं होतं.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीविना स्मृती इराणींचं भाषण दाखवणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमधल्या भोजिपुरा पोलिसात ही तक्रार दाखल झाली आहे.
तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संबंधित निवडणूक अधिकारी आणि शाळेच्या जिल्हा निरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. आचारसंहितेनुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय शाळांमध्ये राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यास मज्जाव आहे.
उत्तर प्रदेशमध्ये चार फेब्रुवारीपासून विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. सहा टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून 11 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या आठवड्यापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement