Maha Vir Chakra Award: गलवानचे वीर कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीरचक्र, इतर पाच जवान वीरचक्रने सन्मानित
'महावीर चक्र' (Maha Vir Chakra Award) युद्धाच्या वेळी देण्यात येणारा दुसरा सर्वोच्च वीर पुरस्कार आहे. वीर चक्र हा पुरस्कार युद्धाच्या वेळी किंवा शत्रुच्या विरोधात केलेल्या उल्लेखनीय साहसाबद्दल देण्यात येते. गलवान खोऱ्यात दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल शहीद कर्नल संतोष बाबू (Colonel Santosh Babu) यांना तो देण्यात येत आहे.
![Maha Vir Chakra Award: गलवानचे वीर कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीरचक्र, इतर पाच जवान वीरचक्रने सन्मानित Colonel Santosh Babu has been awarded with the second highest wartime gallantry honour the Maha Vir Chakra Maha Vir Chakra Award: गलवानचे वीर कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीरचक्र, इतर पाच जवान वीरचक्रने सन्मानित](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/26164311/2a967f25-4c41-48c6-8c15-bfb10ae06124.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त गलवानमध्ये आपल्या वीरतेचे प्रदर्शन केलेल्या कर्नल संतोष कुमार यांना 'महावीर चक्र' या देशाचा दुसऱ्या सर्वोच्च वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. चीन सोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
कर्नल संतोष कुमार यांच्या सोबत गलवान खोऱ्यात राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' च्या दरम्यान चीनी सैनिकांशी झालेल्या झटापटीवेळी शहीद झालेल्या इतर पाच सैनिकांनाही वीर चक्राने सन्मानित करण्यात येत आहे. युद्धाच्या वेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सैनिकांना हे वीर पुरस्कार देण्यात येतात.
Republic Day 2021 | लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांच्यावर राजपथावरील पथसंचलनाची धुरा
लष्कराने जाहीर केलेल्या प्रशस्तीपत्रकानुसार, "15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात ऑपरेशन स्नो लेपर्डच्या दरम्यान बिहार रेजिमेन्टचे (16 बिहार) कर्नल बिकुमाला संतोष बाबू यांना कमांडिंग ऑफिसर म्हणून नेमण्यात आले होते. शत्रू सैनिकांच्या हिंसक आणि आक्रमक कारवाईला विरोध करताना ते जखमी झाले. तरीही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं."
लष्कराने असंही म्हटलं आहे की, "शत्रू राष्ट्राच्या विरोधात दाखवलेल्या अतुलनीय शौर्य, पराक्रम, नेतृत्व आणि केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे."
कर्नल संतोष बाबू यांच्या व्यतिरिक्त ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये भाग घेतलेल्या गलवान खोऱ्यातील इतर पाच सैनिकांनाही त्यांच्या साहसाबद्दल वीर चक्राने सन्मानित करण्यात येत आहे. यातील चार जवानांना मरणोत्तर वीर चक्र देण्यात येत आहे. त्यामध्ये सूभेदार नूदूराम सोरेन (16 बिहार), हवालदार के. पिलानी (81 फील्ड रेजीमेन्ट), नायक दीपक कुमार ( आर्मी मेडिकल कोर-16 बिहार), शिपाई गुरजेत सिंह (3 पंजाब) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त हवालदार तेजेद्र सिंह (3 मीडियम रेजीमेन्ट) यांनाही वीरचक्र देण्यात येत आहे.
नायक दीपक कुमार हे सैन्याच्या मेडिकल कोअरशी संबंधित होते. तेही घटनास्थळी तैनात होते. चीनी सैन्याशी झालेल्या झटापटीत ते जखमी झाले. तशाही परिस्थितीत त्यांनी जवळपास 30 जखमी सैनिकांवर उपचार केले. नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली.
गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीवेळी चीनी सैनिक पूर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे धारधार शस्त्रे होती. असे असताना सुद्धा भारतीय सैन्य त्यांच्यावर वरचढ ठरले होते.
Police Medal | महाराष्ट्रातील 57 शूर पोलिसांना पदक, गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक पदके
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)