Republic Day 2021 | लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांच्यावर राजपथावरील पथसंचलनाची धुरा
Republic Day 2021 लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा हे विशेष सेवा पदानं सन्मानित आहेत. भारतीय सैन्य अकादमीतून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.
Republic Day 2021 प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी साऱ्या देशाचं आणि जगाचं लक्ष दिल्लीतील राजपथावर लागलेलं आहे. अशा या खास दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री, दिग्गज नेते आणि नागरिकांच्या उपस्थितीत दिल्लीतील ध्वजारोहण सोहळा पार पडला. ज्यानंतर निर्धारित रुपरेषेप्रमाणं राजपथावर भारतीय सैन्याच्या पथसंचलनाला सुरुवात झाली.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सैन्याचे एक-एक पदर उलटले जाऊ लागले आणि पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारा आला. देशाभिमानानं उर भरून आणणाऱ्या या पथसंचलनाची धुरा यंदाच्या वर्षी लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी परेड कमांडर आहेत, जनरल ऑफिसर कमांडिंग दिल्ली भागातील लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, तर सेकंड इन कमांडर आहेत मेजर जनरल आलोक कक्कड.
Delhi: Lieutenant General Vijay Kumar Mishra, leads this year's #RepublicDay parade, as the Parade Commander. pic.twitter.com/zmdY9XnisQ
— ANI (@ANI) January 26, 2021
लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांना विशेष सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय सैन्य अकादमीतून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांना डिसेंबर 1985 मध्ये जम्मू काश्मीरमधील 17 व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आलं होतं.
लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा हे डिफेंस सर्विसेज स्टाफ कॉलेज, वेलिंगटनमधील पदवीधारक आहेत. त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महूसोबत नवी दिल्लीतील प्रतिष्ठीत नेशनल डिफेंस कॉलेजमधून हायर कमांड कोर्सचं शिक्षण घेतलं आहे. 1 फेब्रुवारी 2020 मध्ये जीओसी दिल्लीमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी ते सेन्यामुख्यालयात अतिरिक्त महानिर्देशक म्हणून सेवेत होते.