एक्स्प्लोर

राममंदिर उभारणीला रामनवमी किंवा अक्षय तृतीयेचा मुहूर्त; गोविंददेव गिरीमहाराजांची माहिती

राममंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना झाली असून रामनवमी किंवा अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर याची पायाभरणी होणार आहे, अशी माहिती राममंदिर ट्रस्टचे सदस्य गोविंददेव गिरीमहाराजांनी दिली. आगामी दोन वर्षात मंदिर उभारण्याचा दावाही त्यांनी केलाय.

नवी दिल्ली : राममंदिराच्या पायाभरणीसाठी अक्षय तृतीया किंवा रामनवमीच्या मुहूर्ताचा विचार होत असल्याचं गोविंद देवगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तसंच मंदिर उभारणीसाठी दोन वर्षांहून अधिक कालावधी लागणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने एक ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा देखील केली. मोदींच्या घोषनेनंतर यावर लगेच कार्यवाही करत ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून यातील 15 लोकांची नावं घोषित करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातून पुण्यातील स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांची या ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने 9 फेब्रुवारीपर्यंत ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिले होते. याच गोविंद देवगिरी महाराजांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्ताची माहिती दिली आहे. या प्रसंगी अशोक सिंघल यांची आठवण येत असल्याचे गोविंद देवगिरी महाराज म्हणाले. विश्व हिंदू परिषदेसोबत मी जोडलेलो असल्याने मला मंदिर उभारण्याची आधीपासून माहिती आहे. मंदिर उभारण्याचे दोन वर्षांपर्यंत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. राममंदिरासाठी 15 सदस्यीय ट्रस्ट स्थापन, पुण्यातल्या 'या' महाराजांचाही समावेश ट्रस्टमध्ये या 15 जणांचा समावेश 1. के परासरन (सुप्रीम कोर्टातील वकील) 2. शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज) 3. जगतगुरु मधवाचार्य स्वामी (कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर) 4. युगपुरुष परमानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार) 5. स्वामी गोविंद देव गिरी (प्रवचनकर्ता) 6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज) 7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर) 8. कामेश्वर चौपाल (पटना) 9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा , अयोध्या) 10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य 11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य 12. केंद्राचा प्रतिनिधी 13. राज्याचा प्रतिनिधी 14. अयोध्येचे जिल्हाधिकारी 15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष के परासरन यांचं घर ट्रस्टचा पत्ता -  सरकारने राममंदिरासाठी ज्या ट्रस्टची निर्मिती केली आहे. त्या ट्रस्टचा पत्ता के परासरन यांचं घर असणार आहे. राममंदिर प्रकरणात अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टात केस लढणाऱ्या के परासरन यांचा पत्ता R-20 ग्रेटर कैलाश पार्ट वन, नवी दिल्ली असा आहे. Special Report | राम मंदिर ट्रस्टच्या घोषणेमागे दिल्ली निवडणुकांचं टायमिंग? स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीसCM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Embed widget