(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India-China : भारताला सीमा वादात गुंतवून चीनने केलं 'हे' कारस्थान; पेंटॅगनचा धक्कादायक अहवाल उघड
India-China : संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विरोधात लढाई सुरु असताना, तसेच भारत चीनसोबतच्या वादात गुंतला असताना चीन मात्र आपल्या लष्करी तयारीवर जोर देत होता.
नवी दिल्ली : गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये भारताच्या उत्तर सीमेवरील लडाख या ठिकाणी भारत आणि चीनमध्ये सीमावादावरुन तणाव निर्माण झाला होता. पण यामध्ये भारताला गुंतवून ठेवायचं आणि हा चीनचा बनाव होता असं अमेरिकेच्या पेंटॅगनने त्याच्या अहवालात सांगितलं आहे. ज्यावेळी चीनचा भारतासोबत वाद सुरु होता त्याचवेळी पश्चिम हिमालयाच्या परिसरात चीनकडून फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क निर्माण करण्यात येत होतं. संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विरोधात लढाई सुरु असताना, तसेच भारत चीनसोबतच्या वादात गुंतला असताना चीन मात्र आपल्या लष्करी तयारीवर जोर देत होता.
पेंटॅगनने मिलिट्री अॅन्ड सिक्युरिटी डेव्हलपमेन्ट इन्व्हॉल्विंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या शिर्षकाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. एकीकडे भारतासोबत वाद सुरु ठेऊन दुसरीकडे पश्चिमी हिमालयाच्या परिसरात फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क निर्माण करण्यावर चीन भर देत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे चीनच्या कम्युनिकेशनमध्ये जलदता येणार आहे तसचे परकीय इंटरसेप्शनपासून सुरक्षा अधिक बळकट करण्यात येणार आहे.
चीनच्या या नेटवर्कमुळे रीयल टाईम आयएसआर मध्ये मदत होणार आहे. तसेच चीनच्या निर्णय क्षमतेमध्ये जलदता येणार आहे.
15 जून 2020 च्या रात्री नेमकं काय घडलं?
भारत आणि चीनमध्ये 6 जून 2020 रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. घटनास्थळी भारतीय जवानांची संख्या चीनच्या सैनिकांच्या तुलनेने कमी होती. यावेळी चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांना भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्यात 20 जवान जखमी झाले होते. त्यानंतर आज सकाळी भारतीय लष्कराने एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये कर्नल संतोष बाबू, हवालदार पालानी आणि कुंदन झा यांचा समावेश होता.
गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ दोन्ही सैन्यात चर्चा सुरु होती. चीनी सैनिकांच्या हल्यानंतर भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर देत हल्ला चढवला. यामध्ये चीनचे 45 सैनिक मारले गेल्याचा दावा भारताने केला होता.
महत्वाच्या बातम्या :