एक्स्प्लोर

India China Tension : LAC जवळ चीनचा कुटील डाव; गाव वसवल्यानंतर आता उचलले 'हे' पाऊल

India China Tension : चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. चीनकडून सातत्याने या भागात आगळीक केली जात आहे.

India China Tension : चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी गावं वसवली जात आहेत. आता चीनकडून भारताला (India China Tension) असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आता महामार्ग बांधणार आहे. चीन बांधत असलेला महामार्ग हा भारताच्या सीमारेषा भाग मार्गे जिंगजँग आणि तिबेटला जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे चीनची सामरिक स्थिती आणखी मजबूत होणार आहे. लष्कराच्या हालचालीसाठी हा महामार्ग फायदेशीर ठरणार आहे.

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, तिबेटच्या ल्हुंज काउंटीमधून शिंजियांग क्षेत्रातील काश्गर येथे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग हा चीन सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमातंर्गत जाहीर करण्यात आलेल्या 345 नवीन प्रकल्पांपैकी एक आहे. या योजनेनुसार, 2035 पर्यंत एकूण 4 लाख 61 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून चीन आपल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्याचे प्रयत्न करत आहे. 

ल्हुंज काउंटी भाग हा अरुणाचल प्रदेशजवळ आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा करण्यात येतो. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचाच भाग असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो. जी695 या नावाने ओळखला जाणारा महामार्ग हा कोना काउंटी भागातून जाण्याची शक्यता आहे. हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या उत्तर भागात आहे. काम्बा काउंटी भागाची सीमा सिक्कीमला जोडली गेली आहे. गयीरोंग काउंटी नेपाळच्या सीमालगत भागात आहे. तर, गयीरोंग काउंटी भाग  गयीरोंग काउंटी नेपाळच्या सीमा भागात आहे. चीनकडून बांधण्यात येणाऱ्या नव्या राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग हा भारताच्या भूभागातून जाणार आहे. यामध्ये डेपसांग मैदानी प्रदेश, गलवान खोरे आणि हॉट स्प्रिंगसारख्या भागातून जाणार असल्याचे म्हटले जात आहे. 

डोकलामजवळ गावं वसवली

एका बाजूला भारतासोबत लडाखमधील सीमा प्रश्नावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनची विस्तारवादी भूमिका (India China Tension) कायम असल्याचे समोर आले आहे. भारतासाठी रणनीतिकदृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या 'चिकन नेक' जवळ चीनने आगळीक केली आहे. भूटानच्या बाजूने असलेल्या डोकलामजवळ (Doklam) चीनने एक गाव वसवले असल्याचे संकेत देणारे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. हे फोटो मेक्सर कंपनीने घेतले आहे. मेक्सर कंपनी अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget