Vijayamma : लेकीच्या राजकीय पक्षासाठी लेकाची साथ सोडली! सीएम जगनमोहन रेड्डींच्या आई विजयम्मांचा YSR पक्षाला रामराम
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आई (Y S Jagan Mohan Reddy's mother) विजयम्मा (Vijayamma) यांनी वायएसआरसीपीच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा (YSRC honorary president) दिला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आई (Y S Jagan Mohan Reddy's mother) विजयम्मा (Vijayamma) यांनी वायएसआरसीपीच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा (YSRC honorary president) दिला आहे. आपल्या मुलीला आधार देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुलीने तेलंगणामध्ये नवीन पक्ष स्थापन केला आहे, जिथे विधानसभा निवडणुका होणार आहेत.
जगनमोहन रेड्डी (Chief Minister Y S Jagan Mohan Reddy) यांचे बहिणीच्या राजकीय पक्षाच्या स्थापनेनंतर मतभेद झाले होते. अवघ्या वर्षभरापूर्वी शर्मिला यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाची (वायएसआरटीपी) घोषणा केली होती. जगन रेड्डी आपल्या बहिणीच्या तेलंगणात प्रवेशाच्या विरोधात होते. वायएसआरसीपीच्या मानद अध्यक्ष विजयम्मा यांनी लॉन्च प्रसंगी आपल्या मुलीला आशीर्वाद दिला होता. आज त्यांनी पद सोडले आहे.
जगन मोहन रेड्डी यांच्या वडिलांची आज ७३ वी जयंती आहे. यावेळी जगन यांनी अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांना श्रद्धांजली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि आईही उपस्थित होत्या.
मात्र, शर्मिलाचे पती अनिल कुमार या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. अनिलने नुकतेच आंध्र प्रदेशात नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी विशाखापट्टणममध्ये मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याकांच्या विविध गटांच्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा केली होती. ते म्हणाले, माझ्या आवाहनावर त्यांनी YSRCP ला पाठिंबा दिल्याने आता त्यांच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या शब्दांपासून मागे हटू शकत नाही.
विजयम्मा म्हणून प्रसिद्ध
वायएस विजयालक्ष्मी विजयम्मा (Vijayamma) म्हणून प्रसिद्ध आहेत. सप्टेंबर 2009 मध्ये, त्यांनी पती वायएसआर यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लढवली आणि जिंकली. नंतर 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून त्या निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या