एक्स्प्लोर

Chicken Tikka Masala : चिकन टिक्का 'मसाला'वरून भारत आणि पळवून लावलेले इंग्रज पुन्हा आमनेसामने आलेत! नेमका वाद कशाने वाढला?

Chicken Tikka Masala : मसालेदार सॉस आणि ग्रील्ड चिकनच्या रसाळ तुकड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चिकन टिक्का मसाला रेसिपीला लंडन ते न्यूयॉर्कपर्यंतच्या मेनूमध्ये एक विशेष स्थान मिळाले आहे.

Chicken Tikka Masala : चिकन टिक्का मसाला (Chicken Tikka Masala) हा एक डिश आहे जी जगभरातील अनेक लोकांसाठी भारतीय पाककृतीचा समानार्थी बनला आहे. मसालेदार सॉस आणि ग्रील्ड चिकनच्या रसाळ तुकड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चिकन टिक्का मसाला रेसिपीला लंडन ते न्यूयॉर्कपर्यंतच्या मेनूमध्ये एक विशेष स्थान मिळाले आहे. TasteAtlas या लोकप्रिय फूड रिव्ह्यू साइटने जगभरातील 50 सर्वोत्कृष्ट चिकन डिशची यादी प्रसिद्ध केली आहे, जिथे त्यांनी चिकन टिक्का मसाला ब्रिटीश डिश म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि इंग्रज आमनेसामने आले आहेत. नेटिझन्स यावरून इंग्लंडला झोडपण्यास सुरुवात केली आहे. 

चिकन टिक्का मसाला ब्रिटीश म्हणताच प्रतिक्रियांचा पाऊस 

एका यूजर्सने लिहिले की, “चिकन टिक्का मसाला ब्रिटिश कसा झाला? नाव तरी बघा!! तुम्हाला ब्रिटिश वाटतात का?" “चिकन टिक्का मसाला हा भारतीय डिश आहे ब्रिटिश @tasteatlas नाही,” दुसऱ्या युझर्सने प्रतिक्रिया दिली. आणखी एका जिज्ञासू व्यक्तीने टिप्पणी केली की, "चिकन टिक्का मसाला यूकेमधून आला आहे?" अशी विचारणा केली.  बऱ्याच जणांचा असा युक्तिवाद आहे की डिशची मुळं भारतात तितकी घट्ट रोवली जाऊ शकत नाहीत जितकी सामान्यतः मानली जातात. 

View this post on Instagram
 
A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

पण, त्यामागील सत्य काय आहे?

कनिक्का मल्होत्रा, सल्लागार आहारतज्ञ यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार “भारतात चिकन टिक्का मसाला पहिल्यांदा दिसला. पारंपारिक भारतीय पाककृती म्हणजे डिशचे दोन मुख्य घटक, क्रीमी टोमॅटो सॉस आणि चिकन टिक्का, प्रथम दिसले. भारतीयांना चिकन टिक्का आवडतो, मॅरीनेट केलेला बोनलेस चिकन कबाब जो वारंवार तंदूर ओव्हनमध्ये शिजवला जातो. हे शक्य आहे की मलईदार टोमॅटो सॉस इतर करीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुलनात्मक भारतीय सॉसमधून बदलला गेला होता.”

त्या पुढे म्हणतात, “चिकन टिक्का मसाला भारतात उगम पावला असला तरी, युनायटेड किंगडममध्ये ही डिश सर्वप्रथम जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय आणि बांगलादेशी समुदाय यूके आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये स्थलांतरित झाले आणि त्यांच्या पाककृती परंपरा त्यांच्यासोबत आणले. 

चिकन टिक्का मसाल्याच्या उत्क्रांतीवर ब्रिटिश करी हाऊसचा प्रभाव

चिकन टिक्का मसाला बऱ्याच प्रमाणात ब्रिटीश करी आस्थापनांमुळे विकसित झाला आहे, मल्होत्रा ​​म्हणतात की, “स्थानिक अभिरुचीनुसार, ब्रिटीश करी आस्थापनांनी बऱ्याचदा ब्रिटीश जेवणासाठी अधिक ओळखण्यायोग्य घटक आणि स्वयंपाकाच्या पद्धती वापरून डिशमध्ये बदल केले." त्या पुढे म्हणतात की, “अनुकूलतेच्या प्रक्रियेमुळे चव आणि चिकन टिक्का मसाला शिजवण्याच्या पद्धतीमध्ये हलके बदल झाले. ब्रिटीश करी आस्थापनांच्या पार्श्वभूमीवरही, चिकन टिक्का मसाल्यावर भारतीय खाद्यपदार्थांचा अजूनही मजबूत पकड आहे. पाश्चात्य चवीनुसार जेवणात बदल करण्यात आला असला तरी, त्यातील आवश्यक घटक चिकन टिक्का आणि भरपूर टोमॅटो सॉस हे स्पष्टपणे भारतीय आहेत."

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra NewsSpecial Report Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर, जुन्या वादात....नव्याने पाय खोलातDagdushet Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांगShambhuraj Desai On Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करणार, बैठकीत निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार
Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
Embed widget