एक्स्प्लोर

एकाचवेळी तिघांना, एकाच आठवड्यात चौघांना भारतरत्न, अडवाणींपाठोपाठ चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना सर्वोच्च सन्मान! 

Bharat Ratna Award : भारत सरकारने एकाच वेळी तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.   

Bharat Ratna Award : भारत सरकारने एकाच वेळी तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन (मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार) यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ एक तीन ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. गेल्या आठवड्यात भारत सरकारने माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. एकाच आठवड्यात चार दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेय. 

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो. राजकारण, कला, साहित्य, क्रीडा,विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. कृषी क्षेत्रात भरीव योगदानामुळे एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय.  

चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल काय म्हणाले पंतप्रधान ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. 

चौधरी चरण सिंह - 

चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले. त्यांनंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम केलं. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1979 साली ते देशाची अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्याच वर्षी त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली. 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने देशाचे पंतप्रधान बनले. चौधरी चरण सिंह यांना वाचणाची आणि लिखाणाची आवड होती. त्यांनी जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरीबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या पुस्तकांचे लिखाण केलं. 

पी व्ही नरसिंह राव

राजीव गांधी यांच्या निधनानंतर देशात पन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आणि पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले.  1991 ते 1996 या दरम्यान ते देशाचे नववे पंतप्रधान होते. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, देशावर आर्थिक संकट आलं असताना त्यांनी नव्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या. त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्या साथीने त्यांनी 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था खुली केली आणि जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण राबवले. आज जो काही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दिसतोय त्यामध्ये पी व्ही नरसिंह राव यांचे महत्त्वाचे योगदान होतं. देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिह राव (P.V. Narasimha Rao) यांचे 23 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले.

एमएस स्वामीनाथन

स्वामिनाथन यांना 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. अनेक पुरस्कारांव्यतिरिक्त, स्वामिनाथन हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार (1971) आणि अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार (1986) प्राप्तकर्ते आहेत. तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात स्वामीनाथन यांचा जन्म झाला.1960 च्या दशकात जेव्हा नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची शक्यता होती, तेव्हा उच्च उत्पादन देणार्‍या गहू आणि तांदळाच्या जाती भारतात आणल्याबद्दल आणि विकसित करण्यासाठी त्यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यांची मुलगी डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी 2019-2022 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेत (WHO) मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला MSSRF चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget