एक्स्प्लोर
देशात 100 शहरांतील गरिबांचं घरभाडं सरकार भरण्याची शक्यता
मुंबई : येत्या काही दिवसात देशातल्या 100 शहरांमध्ये राहणाऱ्या गरिबांचं घरभाडं सरकार भरण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी 2 हजार 700 कोटींची तरतूद केली जाणार आहे. मोदी सरकार या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे.
सर्व गरिबांना एकाचवेळी घरं उपलब्ध करुन देणं शक्य नसल्यानं सरकारनं हा मधला मार्ग काढल्याची माहिती आहे. शहरांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निधीच्या वितरणाची जबाबदारी असेल. पालिका किंवा महापालिका गरिबांना घरभाड्याचे कुपन देणार आहे. तेच कूपन भाडेकरु घरमालकाला देईल आणि घरमालक ते कूपन बँकेत भरुन त्याचे पैसे मिळवेल.
शहरी भागातली 27 टक्के जनता ही भाड्याच्या घरात राहते, त्यामुळे या भाडेकरुंच्या बँक खात्यांमध्ये भाड्याची रक्कम जमा करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. ही योजना पुढच्या तीन वर्षांसाठी असून 2018 मध्ये याची सुरुवात होण्याची चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement