एक्स्प्लोर

Corona | महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबसाठी 50 केंद्रीय पथकं, एकट्या महाराष्ट्रात 30 पथकं दाखल

महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तीन राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्राने 50 हाय लेव्हल हेल्थ टीम पाठवल्या आहेत. या टीम स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय साधत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. रविवारी एकाच दिवशी एक लाखाहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली होती. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तीन राज्यात कोरोनाचा कहर झाल्याचं दिसून येतोय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता केंद्र सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली असून या तीन राज्यांत सोमवारी 50 हाय लेव्हल हेल्थ टीम पाठवण्यात आल्या आहेत. 

या प्रत्येक टीममध्ये दोन सदस्य असतील. त्यामध्ये एक इपिडर्मिटोलॉजिस्ट आणि एक आरोग्य तज्ज्ञाचा समावेश असेल. या टीम महाराष्ट्रातील 30 जिल्हे, छत्तीसगडमधील 11 जिल्हे आणि पंजाबमधील 9 जिल्ह्यातील स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय साधणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोरोना काळात घ्यावयाच्या खबरदारी, उपलब्ध सुविधा, टेस्टिंग आणि इतर गोष्टींबद्दलही मार्गदर्शन करणार आहेत. 

सोमवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्रात 47,288, छत्तीसगडमध्ये 7,302 आणि पंजाबमध्ये 2,692 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. देशातल्या एकूण नवीव रुग्णसंख्येपैकी अर्ध्या रुग्णसंख्येची भर ही एकट्या महाराष्ट्रातून पडत आहे. 

देशातील कोरोनाचा उद्रेक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. रविवारी बोलताना पंतप्रधानांनी 5 फोल्ड स्ट्रॅटेजी म्हणजे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेन्ट, गाईडलाइन्स नुसार वर्तन आणि लसीकरण या गोष्टींचे गंभीरपणे पालन केल्यास कोरोनाचे संकट नियंत्रणात येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला होता. 

देशातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखावर
देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं सांगण्यात येतंय. सध्या देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती संख्या आता सात लाखावर गेली आहे. गेल्या चोवीस तासात 50,438 अॅक्टिव्ह रुग्णांची भर पडली आहे. देशातील 88 टक्के अॅक्टिव्ह रुग्णसंख्या केवळ दहा राज्यांत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगतेय.

देशभरात गेल्या रविवारी कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोनानं शिरकाव केल्यापासून पहिल्यांदाच देशात नव्या कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 3 हजार 588 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 26 February 2025Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोरPune Crime Swargate St depot | स्वारगेट बस स्टॅण्डमधील बलात्काराचं प्रकरण नक्की काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Embed widget