एक्स्प्लोर

Corornavirus : देशात गेल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद; जवळपास अर्धी रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना संसर्ग झाल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसांत एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आढळून आले. तर महाराष्ट्रात काल 47 हजार 288 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोनानं शिरकाव केल्यापासून पहिल्यांदाच देशात नव्या कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 3 हजार 588 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे.

आतापर्यंत एक लाख 65 हजार रुग्णांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता एक कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्याही वाढत असून ती आता सात लाख 41 हजार 830 इतकी झाली आहे. रविवारी 52,847 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता एक कोटी 16 लाख 82 हजार 136 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत एक लाख 65 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

देशातील सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काल (सोमवारी) महाराष्ट्रात 47 हजार 288 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 155 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 30 लाख 57 हजार 885 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 56 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावेळी राज्यात 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच राज्यात रविवारी एका दिवसांत 57 हजार 74 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ होती. तर 222 रुग्णांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला होता. 

देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. रविवारी मुंबईत एकाच दिवसांत तब्बल 9 हजार 857 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 3 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण 3 लाख 74 हजार 985 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सध्या 74 हजार 522 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उद्या आढावा बैठक; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार

25 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र 

कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील कोरोनापासून वाचवणं आवश्यक आहे. त्यामुळे 25 वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण करावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. लसीकरणाचा वयोगट ठरवण्याचा अधिकार केंद्र शासनाचा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget