एक्स्प्लोर

रमझानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाया थांबणार!

याचदरम्यान केंद्र सरकारने नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरुन सगळेच रमझान महिना शांततेने साजरा करु शकतात.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये रमझानच्या महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही. पण दहशतवाद्यांनी हल्ला केला तर स्वत:च्या आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांना प्रत्युत्तर कारवाई करता येणार आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमध्ये सशर्त सीझफायरचा आदेश जारी केला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या आदेशाची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दिली. रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवा : मेहबुबा मुफ्ती केंद्र सरकारच्या आदेशानुसार, रमझानच्या माहिन्यात सुरक्षा यंत्रणा जम्मू काश्मीरमध्ये कोणतीही नवी कारवाई करणार नाहीत. पण कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कारवाई करण्याचा अधिकार सुरक्षा यंत्रणांकडे राहील. सामान्य नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा कारवाई करु शकतात. याचदरम्यान केंद्र सरकारने नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरुन सगळेच रमझान महिना शांततेने साजरा करु शकतात. मेहबुबा मुफ्ती यांची मागणी काश्मीरमध्ये 9 मे रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी चकमकीदरम्यान सामान्य नागरिकांचे होणारे मृत्यू पाहता सीजफायरची मागणी केली होती. “सामान्य नागरिकांचा मृत्यू होत आहे. तरुण बंदुकी हातात घेत आहेत. दगडफेकीमुळे तामिळनाडूच्या पर्यटकाचा जीव घेतला. त्यामुळे मे महिन्याच्या मध्याला रमझान सुरु झाल्यापासून ऑगस्ट महिन्यात अमरनाथ यात्रा संपेपर्यंत सीझफायरबाबत विचार करावा. केंद्र सरकारने वाजपेयी सरकारप्रमाणे सीजफायरचा निर्णय घेतला पाहिजे, असं त्या म्हणाल्या. आपल्या मतावर बैठकीतील प्रत्येकाने सहमती दर्शवल्याचा दावाही त्यांनी केला होता. सीझफायर म्हणजे काय? दहशतवादी किंवा सीमेवर भारतीय सैन्य कारवाई करत नाही तेव्हा  त्याला सीझफायर किंवा युद्धविराम म्हणतात. सीझफायरमध्ये सुरक्षा यंत्रणा आधी कारवाई करत नाहीत. ज्या दिशेने गोळीबार किंवा हल्ला होतो, त्याला सीझफायरचं उल्लंघन म्हणतात. नोव्हेंबर 2000 मध्ये वाजपेयी सरकारने सीझफायरची घोषणा केली होती. रमझानमुळे काश्मीर खोऱ्यात सीझफायरची घोषणा झाली होती. त्यावेळी रमझानच्या महिन्यात काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. यावेळी सुरक्षा यंत्रणांना कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला होता. परंतु अतिरेकी हल्ला झाल्यास कारवाईचा अधिकार होता.  यावेळीही रमझान तसंच अमरनाथ यात्रेमुळे पुन्हा एकदा सीझफायरची मागणी करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jalgaon Loksabha Voting Center : मतदान केंद्रावर बालसंगोपन, महिला मतदात्यांचा टक्का वाढीसाठी प्रयत्नNilesh Lanke On opponent : मतदारसंघात मतदानासाठी पैसे वाटप, लंकेचा विरोधकांवर आरोपRaosaheb Danve Jalna Vote :  पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्कMurlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Embed widget