Corona Vaccination : जून महिन्यात कोरोना लसीचे 12 कोटी डोस उपलब्ध होतील, केंद्र सरकारची माहिती
मे महिन्यात केंद्र सरकारने राज्यांना 4 कोटी 3 लाख 49 हजार 830 लसींचे डोस विनामूल्य दिले होते. याशिवाय मे महिन्यात राज्यांसह खासगी रुग्णालयांच्या थेट खरेदीसाठी एकूण 3 कोटी 90 लाख 55 हजार 370 डोस देखील उपलब्ध होते.
नवी दिली : देशात कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जून महिन्यात सुमारे 12 कोटी कोरोना लसीचे डोस उपलब्ध होतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने दिली आहे. त्यापैकी सुमारे 6 कोटी 9 लाख डोस केंद्र सरकार विनामूल्य वाटप करणार आहे. तर 5 कोटी 86 लाख पेक्षा जास्त डोस राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांद्वारे थेट खरेदीसाठी उपलब्ध असतील. मे महिन्यात सुमारे 8 कोटी कोरोना लस डोस उपलब्ध होते.
जून महिन्यासाठी आरोग्य सेवा कामगार (एचसीडब्ल्यू),आघाडीवरचे कामगार (एफएलडब्ल्यू) आणि 45 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीसाठी प्राधान्य गट लसीकरणासाठी कोविड प्रतिबंधक लसींच्या 6.09 कोटी (6,09,60,000) डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या जातील. याव्यतिरिक्त, राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांना थेट खरेदीसाठी 5.86 कोटी (5,86,10,000)पेक्षा जास्त डोस उपलब्ध असतील. त्यामुळे जूनमध्ये 12 कोटी (11,95,70,000) डोसे राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी उपलब्ध असतील.
मे महिन्यात केंद्र सरकारने राज्यांना 4 कोटी 3 लाख 49 हजार 830 लसींचे डोस विनामूल्य दिले होते. याशिवाय मे महिन्यात राज्यांसह खासगी रुग्णालयांच्या थेट खरेदीसाठी एकूण 3 कोटी 90 लाख 55 हजार 370 डोस देखील उपलब्ध होते. म्हणजेच मे महिन्यात कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी एकूण 7 कोटी 94 लाख 5 हजार 200 डोस उपलब्ध झाले.
या लसींच्या वाटपाचे वेळापत्रक राज्यांना शेअर केले जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, संबंधित अधिकाऱ्यांना वाटप केलेल्या डोसचा तर्कसंगत आणि न्याय वापर सुनिश्चित करावा आणि लसीचा अपव्यय कमी करावा.
देशव्यापी कोरोना लसीकरण धोरण 1 मे 2021 पासून लागू करण्यात आले आहे ज्यामध्ये उपलब्ध मात्रांपैकी 50 टक्के डोस राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा करण्यासाठी राखून ठेवल्या आहेत. तर उर्वरित 50 टक्के राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयाना लस उत्पादकांकडून थेट खरेदीसाठी उपलब्ध आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : महापौर किशोरी पेडणेकर 'द ललित'मध्ये दाखल; लसीकरणाच्या पॅकेजसंदर्भातील चौकशीतून महत्त्वाचा खुलासा
- Mann ki Baat : गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी देश पूर्ण ताकतीनं लढतोय: पंतप्रधान नरेंद्र मोदी
- 7 Years of Modi Government : मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण; पण देशाचा कारभार काँग्रेसच्याच कामगिरीवर सुरु आहे - संजय राऊत