CBSE : दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या टर्म परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 'या' ठिकाणी पाहा
CBSE Timetable : सीबीएसई बोर्डकडून 26 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या दुसऱ्या टर्मचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: येत्या 26 एप्रिलपासून दुसऱ्या टर्मसाठी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सीबीएसईने जाहीर केलं आहे. सकाळी 10.30 वाजता या परीक्षांची वेळ सुरू होणार आहे. दुसऱ्या टर्मचे नवीन वेळापत्रक सीबीएसईने त्यांच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलं आहे.
दुसऱ्या टर्ममध्ये विद्यार्थ्यांना ऑबजेक्टिव्ह आणि सबजेक्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेसाठी सँपल पेपर पॅटर्न फॉलो करण्यात येणार आहे.
टर्म 1 चा निकाल जाहीर
सीबीएसईने आज 10वी टर्म-1चा निकाल जाहीर केला आहे. परंतु, विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहू शकणार नाहीत. अहवालानुसार, सीबीएसईने शाळांना मेलद्वारे हा निकाल पाठवला आहे. यासाठी विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांशी संपर्क साधू शकतात आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांचे स्कोअर कार्ड अर्थात गुणपत्रिका मिळवू शकतात. स्कोअर कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय गुणांचा तपशील असू शकतो. तर, शाळा अधिकारी अधिकृत शैक्षणिक मेल आयडीद्वारे हा निकाल पाहू शकतात. अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण तपासता येतील.
यावेळी सीबीएसईने अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केलेला नाही. यापूर्वी संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. शाळा विद्यार्थ्यांचा निकाल डाऊनलोड करू शकते. लवकरच 10वी टर्म 1चे निकाल देखील अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या :
- CBSE 10th Result 2022 : CBSE 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कशी मिळवाल गुणपत्रिका? जाणून घ्या...
- Online Exam: मुंबई विद्यापीठप्रमाणेच अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्या!
- NEET Age Limit : मोठी बातमी! NEET परीक्षेसाठी वयाची मर्यादा हटवली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha