CBSE Datesheet | सीबीएसई 10 वी 12 वी बोर्डाचे उर्वरित पेपरचे वेळापत्रक जाहीर
सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या डेड शीट जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबतच वेळापत्रक आज आपण जाहीर करत असल्याचं सांगितलं होत.
![CBSE Datesheet | सीबीएसई 10 वी 12 वी बोर्डाचे उर्वरित पेपरचे वेळापत्रक जाहीर CBSE Datesheet cbse board exam datesheet 2020 time table out today CBSE Datesheet | सीबीएसई 10 वी 12 वी बोर्डाचे उर्वरित पेपरचे वेळापत्रक जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/18185153/7f85211a2a734658d1b3d10dae7ea120.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या डेड शीट जाहीर करण्यात आलं आहे. सीबीएसई बोर्डाच्या cbse. nic.in या संकेतस्थळवर हे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी 10वी आणि 12वी सीबीएसईचे वेळापत्रक पाहू शकतील.
10वीची संपूर्ण डेटशीट जाहीर केली असून ही परीक्षा पूर्व दिल्लीची डेटशीट आहे. पहिला पेपर 1 जुलै रोजी सोशल सायन्सचा पेपर असणार आहे. 2 जुलै रोजी सायन्स थिअरी आणि सायन्स प्रक्टिकल शिवाय होणार आहे. तिसरा पेपर 10 जुलै रोजी हिंदी कोर्स ए आणि कोर्स बीचा होणार आहे. चौथा 15 जुलै रोजी इंग्लिश कम्युनिकेटिव्ह आणि इंग्लिश लॅग्वेज, लिटचा होणार आहे. तसेच 12वीच्या परिक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. 2 जुलै रोजी हिंदीचा पेपर असणार आहे. तर 1 जुलै रोजी होम सायन्सचा पेपर असणार आहे.
सीबीएसई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अटी आणि नियम पाळणं गरजेचं असणार आहे. परीक्षेच्या वेळेस हँड सॅनिटायजर, ट्रान्सपरंट बॉटलमध्ये विद्यार्थ्याने बाळगायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने नाक, तोंड मास्कने झाकणं आवश्यक आहे. प्रत्येकाने फिजिकल डिस्टन्स बाळगणं गरजेचं आहे. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याची काळजी घेऊन त्याला खबरदारी घेण्यास सांगायची आहे.
भारतात कोरोनाचा कहर सुरु आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 96 हजारांच्या पार पोहोचला आहे. अशातच देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाला. या अनेक विद्यार्थ्यांच्या परिक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे उर्वरित विषयांचे पेपर हे पुढे ढकलण्यात आले होते. हे उर्वरित पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबतच वेळापत्रक आज आपण जाहीर करत असल्याचं सांगितलं होतं.
8 मे रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीएसई बोर्डाची उर्वरित परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान नियोजित करत असल्याच सांगितलं होतं.
दरम्यान, सोशल मीडियावर सीबीएसईच्या वेळापत्रकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे व्हायरल होत असलेलं वेळापत्रक खोटं असून विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक या ट्विटर हँडलवरुन व्हायरल झालेलं वेळापत्रक खोटं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)