एक्स्प्लोर
Advertisement
चाईल्ड पॉर्न व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर, अॅडमिनला अटक
व्हॉट्सअॅप ग्रुपवर लहान मुलांचे पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ‘KidsXXX’ नावाच्या या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये भारतासहे परदेशातील एकूण 119 जण मेंबर आहेत.
कानपूर (उत्तर प्रदेश) : व्हॉट्सअॅप ग्रुपवर चाईल्ड पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याने एका ग्रुप अॅडमिनला सीबीआयने अटक केली आहे. तसेच, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेशसह अन्य राज्यांमधील एकूण पाच जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाईल्ड पॉर्न व्हिडीओ पसरवणाऱ्यांचा हा एकप्रकारे रॅकेट चालवलं जात होतं.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर लहान मुलांचे पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ‘KidsXXX’ नावाच्या या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये भारतासहे परदेशातील एकूण 119 जण मेंबर आहेत. हा ग्रुप मास्टर ग्रुप म्हणून काम करत होता. यावर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर, यातील इतर मेंबर आपापल्या ग्रुपमध्ये तो व्हिडीओ पसरवत असत.
भारतासह अमेरिका, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलका, ब्राझिल, केनिया, नायजेरिया, मेक्सिको आणि न्यझीलंड येथीलही लोकांचा या ग्रुपमध्ये समावेश आहे.
कन्नौज जिल्ह्यातील पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, हरदेवगंजमध्ये 20 वर्षीय निखील वर्मा याला अटक करण्यात आली आहे. निखीलने स्थानिक कॉलेजमधून बीकॉम करत असून, वडिलांना ज्वेलरीच्या दुकानात मदत करतो. तो या वादग्रस्त ग्रुपचा अॅडमिन आहे.
निखील वर्माला अटक करण्यात आली आहे. तर मुंबईतील सत्येंद्र चौहान, दिल्लीतील नफीज, शाहीद आणि नोएडातील आदर्श हे या ग्रुपचे इतर अॅडमिन आहेत.
दरम्यान, या रॅकेटचा तपास सध्या प्राथमिक स्तरावर आहे. मात्र गरज भासल्यास ग्रुपमधील परदेशातील व्यक्तींना अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जाऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement