एक्स्प्लोर
एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ!
मुंबई: नोटाबंदीच्या तब्बल 50 दिवसानंतर आता नव्या वर्षात देशवासियांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कारण की, 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2017 पासून एटीएममधून 4500 रुपये प्रत्येक दिवसाला काढता येणार आहेत. पीटीआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
8 नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. एटीएममधून केवळ सुरुवातीला फक्त 2500 रुपये काढता येत होते. मात्र, आता ही मर्यादा वाढविण्यात आली असून आता एकावेळी 4500 रुपये काढता येणार आहेत. गेले अनेक दिवस पैशांची चणचण नागरिकांना भासत होती. या निर्णयानं देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा जरी वाढली असली तरीही बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आतापर्यंत थेट बँकेतून चेकद्वारे किंवा स्लीपनं 24000 रुपये काढता येत होते. ही मर्यादा सध्या तरी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, एटीएमच्या मर्यादेत वाढ करुन सरकारनं नववर्षाचं अनोखं गिफ्ट दिलं आहे.Cash withdrawal limit from #ATMs increased to Rs 4,500 from Rs 2,500, effective January 1: #RBI #Demonetisation pic.twitter.com/5QhdaIc7Wh
— Press Trust of India (@PTI_News) December 30, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement