एक्स्प्लोर

Punjab : पंजाबच्या राजकारणात धमाका होणार? कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना

कॉंग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतल्यानंतर नाराज झालेले कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt Amarinder Singh) आज अमित शाह (Amit Shah) आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटणार आहेत. 

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) राजकारणाने वेगळं वळण घेतलं असून कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत झालेल्या वादानंतर काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते. 

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. शेवटी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

'आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही' असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस हायकमांडला दिला होता. त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपण नाराज असल्याचं सांगत आपल्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचंही सांगितलं होतं.

पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेसचा चेहरा जर नवज्योतसिंह सिद्धू असतील तर त्यांच्या पराभव करण्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या आधीच स्पष्ट केलंय. 

पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदावर आणि प्रत्येक राजकीय हालचालीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची बारीक नजर होती. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आतुरलेल्या भाजपने आपला पहिला डाव टाकला असून त्याचाच एक भाग म्हणून आज कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्लीत येणार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह आता भाजपमध्ये प्रवेश करणार का याची उत्सुकता आहे. 

गेल्या आठ महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ऐनवेळी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारखा मोहरा भाजपच्या हाती लागल्यास सत्तेचा डाव भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आता पंजाबमधील शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला असलेला विरोध लक्षात घेता कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची रिक्स घेतात का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणाVidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाजVijay Shivtare on Cabinet Expansion : अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही - विजय शिवतारेSudhir Mungantiwar : मंत्रिपद नाही, प्रत्येक वाक्यात वेदना, हळहळून सुधीरभाऊ काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
Embed widget