एक्स्प्लोर
Advertisement
देशभरात आज तीन तास केबल सेवा बंद राहणार
देशभरातील केबल व्यावसायिकांनी आज (27 डिसेंबर) तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) देशभरातील केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना आवडत्या वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचबरोबर केबल टीव्ही व्यावसायिकांवर जाचक अटी घातल्या असल्याचा आरोप करत देशभरातील केबल व्यावसायिकांनी आज (27 डिसेंबर) तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
केबल व्यावसायिक आज संध्याकाळी सात ते रात्री 10 या वेळेत केबल सेवा बंद ठेवणार आहेत. या आंदोलनामुळे प्रेक्षक ‘प्राइम टाइम’मधील अनेक मालिकांना मुकणार आहेत. तसेच यासंदर्भात चर्चा करण्य़ासाठी केबल व्यावसायिकांची आज मुंबईत बैठक होणार आहे.
केबल व्यावसायिकांनी ट्रायच्या नव्या धोरणांवर आरोप केले आहेत की, नव्या धोरणातील नियम आखताना ट्रायने केबल, डीटीएच सेवा देणाऱ्या घटकांचे भविष्य अधांतरी ठेवले आहे. तसेच नवे नियम ग्राहकांच्या हिताचे नाहीत. ट्रायच्या नव्या नियमांचा निषेध नोंदवण्यासाठी केबल व्यावसायिक उद्या लाक्षणिक आंदोलन करणार आहेत.
ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहिन्यांची निवड करता यावी यासाठी, ट्रायने सर्व अधिकृत वाहिन्यांचे दर निश्चित करायला लावले आहेत. नवे नियम २९ डिसेंबरपासून लागू करण्यासाठी ट्रायकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
पुढील महिन्यांपासून दर महिन्याला किती खर्च होणार?
नेटवर्क फी म्हणून ग्राहकांकडून 130 रुपये आणि त्यावरील टॅक्स घेतला जाईल. ज्यामध्ये ग्राहकांना 100 फ्री टू एअर चॅनेल्स दिले जातील त्यापैकी 26 चॅनेल्स हे दूरदर्शनचे आहेत. दूरदर्शनचे चॅनेल्स ग्राहकांना देणे अनिवार्य आहे. हे सर्व चॅनेल्स ट्रायने निवडलेले आहेत. यापेक्षा जास्त आणि आवडीचे चॅनेल्स पाहण्यासाठी ग्राहकांना त्या-त्या चॅनेलच्या बेस प्राईस रेंजनुसार पैसे द्यावे लागतील. चॅनेल्सची सबस्क्रिप्शन प्राईस रेंज 1 ते 19 रुपये इतकी आहे. आवडीच्या 25 चॅनेल्ससाठी अतिरिक्त 20 रुपये द्यावे लागतील.
संबंधित बातम्या
29 डिसेंबरनंतर तुमचं टीव्ही पाहणं स्वस्त होणार की महाग?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement