एक्स्प्लोर

ABP C Voter Survey:  पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेक्षणात समोर आला लोकांचा कौल

ABP C Voter Survey: केंद्रात मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने एक सर्वेक्षण केले आहे. यामध्ये पंतप्रधान पदाच्या पसंतीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता.

ABP C Voter Survey:  केंद्रात मोदी सरकारने (Modi Government) त्यांच्या नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या नऊ वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा भाजपकडून (BJP) करण्यात आला तर विरोधकांकडून यावर चांगलीच टीका देखील करण्यात आली. आता एका वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता जाणार का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एका बाजूला विरोधी पक्षांकडून एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तर भाजपाकडून केंद्रात सत्तेची हॅट्ट्रिक मारण्याची तयारी सुरु आहे.  

याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान पदाच्या पसंतीचा सवाल करण्यात आला होता. पंतप्रधान पदासाठी भाजपचे नरेंद्र मोदी की काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी यापैकी कोणाला मतदान कराल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना 56 टक्के लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर 35 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तर पाच टक्के लोकांनी कोणालाही पसंती दर्शवली नाही आहे. चार टक्के लोकांनी निश्चित सांगता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकानंतर देशात पुढील पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.       

पंतप्रधान मोदी की राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी कोणाला पसंती? 

नरेंद्र मोदी - 56 टक्के 
राहुल गांधी - 35 टक्के 
दोन्ही नाही - 5 टक्के 
माहीत नाही - 4 टक्के 

विरोधकांचा एकजूटीचा प्रयत्न

भाजपविरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट झाली. तसेच आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्रीदेखील विरोधी पक्षांच्या भेटी घेत आहेत. तूर्तास तरी विरोधकांकडून एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

भाजपची रणनिती काय?

केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याने 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानचा दौरा करतील. इथूनच भाजप त्यांच्या विशेष अभियानाची सुरुवात करणार आहे. या अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते देशभरात त्यांचे कार्यक्रम करतील. हे कार्यक्रम म्हणजे भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget