एक्स्प्लोर
गोव्यात पोर्तुगीजकालीन पूल कोसळला, 50 जण नदीत पडल्याची भीती
गोवा: गोव्यामधील सावर्डे गावात असणारा एक पोर्तुगीजकालीन पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. पूल कोसळल्यानं 50 जण नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण या पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. अनेकजण त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी हा पूल अचानक नदीत कोसळला आणि अनेकजण नदीत पडले.
या पूलावरील 50 लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात आलं असून बस्वराज मालानवर या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. सध्या युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे.
दरम्यान, याप्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement