Viral Video : चटकदार पाणीपुरी खाताय? मग हा व्हिडीओ बघाच...विक्रेत्याने पाणीपुरीत मिसळली लघवी
पाणीपुरीवाल्याने आपली लघवी पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मिसळली आणि ते लोकांना सर्व्ह केलं. हा धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबई : अनेकांसाठी पाणीपुरी म्हणजे जीव की प्राण, विशेषत: तरुण वर्गामध्ये याचे खवय्ये जास्त. मग कोणत्याही ठिकाणी पाणीपुरीचा गाडा दिसला रे दिसला की हे खवय्ये त्यावर तुटून पडलेच. पण आता पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये पाणीपुरीचा गाडा चालवणारा व्यक्ती आपली लघवी पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात मिसळताना दिसत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ गुवाहाटीमधील आहे.
गुवाहाटीच्या रस्त्यावर पाणीपुरीचा गाडा चालवणारा व्यक्ती एका मगात लघवी करतो आणि तिच लघवी पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात मिसळतो. नंतर ते पाणी तो पाणीपुरी खाणाऱ्यांना सर्व्ह करतो. ज्या मगात लघवी केली असते तोच मग तो पाणीपुरीसाठी वापरतो. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने चोरुन व्हिडीओ केल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे.
Shocking!A street vendor(pani puri saller) has been arrestd in Guwahati after viral a sensational video in which he mixed his urine with water and using the same Water in Pani Puri.#ViralVideo #Guwahati @ABPNews @ANI @the_viralvideos @ViralPosts5 @indiatvnews @TheQuint @SkyNews pic.twitter.com/ncekjhMeh1
— Mamun Khan (@Mk817Khan) August 20, 2021
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटीमधील अठगांव चौकातील हा व्हिडीओ असून संबंधित पाणीपुरीवाल्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्या पाणीपुरीवाल्याचा चांगलाच समाचार घेतल्याची माहिती आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा नोंद करुन कडक कारवाई करण्यात येत आहे.
काही वर्षापूर्वी मुंबईतही अशीच एक घटना घडली होती. मुंबईमध्ये एका पाणीपुरीवाल्याने आपली लघवी पाणीपुरीच्या पाण्यात मिसळल्याची घटना घडली होती. त्या संबंधी एका मुलीने व्हिडीओ काढला होता आणि सोशल मीडियावर टाकला होता. त्यावर एका बड्या पक्षाच्या नेत्याने त्या मुलीलाच दोषी धरत तिच्यावर चांगले संस्कार झाले नसल्याचा आरोप केला होता.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून मुंबईच्या आणि राज्यातल्या इतर शहरांतील रस्त्यावर बेकायदेशीर पाणीपुरी आणि इतर स्टॉल वाढताना दिसत आहेत. तसेच त्या ठिकाणी स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
- Aussi Swimmer Video Viral : सुवर्ण पदक जिंकल्याच्या आनंदात महिला स्वीमरची जीभ घसरली, चूक लक्षात येताच तत्काळ सुधारली
- 'कायद्याचा बालेकिल्ला, ओन्ली अमरावती जिल्हा' म्हणत पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणं पोलिसाला महागात
- US Plane Inside Pics: विमान आहे की 'वडाप'; जीव वाचवण्यासाठी अमेरिकेच्या विमानात शिरले तब्बल 800 जण