Flights Bomb Threat Case : 30 विमानांना बाॅम्बच्या धमक्या; केंद्र सरकारकडून पहिला सर्जिकल स्ट्राईक! NIA आणि IB कडून सुद्धा अहवाल मागवला
Flights Bomb Threat Case
Flights Bomb Threat Case : देशातील प्रवासी विमानांना बाॅम्बच्या धमक्यांची मालिका सुरूच आहे. शनिवारी 30 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर पूर्ण तपासणीनंतर विमाने रवाना करण्यात आली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे तासनतास हाल झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीलाही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी, संध्याकाळी उशिरा केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवून कोळसा मंत्रालयात सचिव केले. हा बदल धोक्याच्या बाबींशी जोडला जात आहे. त्याच वेळी, एकाच वेळी 30 धमक्या मिळाल्यानंतर, विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ब्युरोचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी त्यांना आश्वासन दिले की भारतीय आकाश पूर्णपणे सुरक्षित आहे.
आठवड्यात 200 कोटींचे नुकसान
विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावर विमान त्याच्या नियोजित विमानतळाऐवजी जवळच्या विमानतळावर उतरवले जाते. यामुळे इंधनाचा वापर जास्त होतो एवढेच नाही तर विमानाची पुन्हा तपासणी करणे, प्रवाशांना हॉटेलमध्ये बसवणे आणि त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्याची व्यवस्था करावी लागते. एका अहवालानुसार या सगळ्यावर सुमारे 3 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आठवड्यात विस्तारा, एअर इंडिया, इंडिगो, आकासा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअरच्या 70 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमक्या आल्या आहेत.
लंडन आणि दुबईला जाणाऱ्या विमानांना बॉम्बची धमकी शुक्रवारी रात्री उशिरा एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा एअरलाइन्सच्या प्रत्येकी एका फ्लाइटवर बॉम्बची धमकी देण्यात आली. यापैकी दिल्लीहून लंडनला जाणारे विस्तारा विमान फ्रँकफर्टला वळवण्यात आले. तर 189 प्रवाशांना घेऊन दुबई जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसचे (IX-196) फ्लाइटचे जयपूरमध्ये दुपारी 1:40 वाजता आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. तपासादरम्यान दोन्ही विमानांमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. विमानात बॉम्ब ठेवल्याची खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याने 14 ऑक्टोबरला इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती.
दिल्ली पोलिसांनी 6 एफआयआर नोंदवले
सततच्या धमक्यांमुळे दिल्ली पोलिसांनी 6 एफआयआर नोंदवले आहेत. दुसरीकडे, विमानात बॉम्ब असल्याचा खोटा दावा करणारी 10 सोशल मीडिया खाती सरकारने ब्लॉक केली आहेत.
धमकीचे संदेश पाठवणाऱ्यांची ओळख - विमान वाहतूक मंत्रालयाने 16 ऑक्टोबर रोजी विमान कंपन्यांना धमकीचे संदेश पाठविण्याबाबत संसदीय समितीला उत्तर दिले. आरोपींची ओळख पटली असून कारवाई सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले. तसेच अधिक माहिती संकलित करण्यात येत असून अशा अनेक प्रकरणांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व सायबर युनिट्सना धमकी देणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सचा मागोवा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश खाती परदेशातून चालवली जात आहेत.