एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा भाजपचा देशातला सातवा विजय
मुंबई : महापालिका निकालांनी काल महाराष्ट्रात भाजपची लाट असल्याचं दाखवून दिलं आहे. तिकडे यूपीची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात असं यश मिळाल्याने भाजपचा उत्साह वाढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह सर्वांनीच महापालिका विजयांचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक केलं. विशेष म्हणजे काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या विजयाला नोटबंदीशी जोडत, काँग्रेसने किमान एका जबाबदार विरोधकाची भूमिका जरी या विषयावर घेतली असती तर त्यांची इतकी वाताहत झाली नसती, असा टोला लगावला आहे.
8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर झालेल्या प्रत्येक स्थानिक निवडणुकीत भाजपने यश मिळवलं आहे. महाराष्ट्राचा कालचा विजय हा या मालिकेतला सातवा विजय ठरला आहे.
गुजरातमधल्या नगरपालिका निवडणुका, मध्य प्रदेश-अरुणाचलमधल्या विधानसभा पोटनिवडणुका, ओडिशामधल्या स्थानिका निवडणुका, चंदीगढ महापालिका या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं आहे. यातल्या अनेक निवडणुका या स्थानिक पातळीवरच्या असल्या तरी त्या नोटबंदीनंतर लगेचच झाल्याने हे यश म्हणजे त्या निर्णयालाच कौल असल्याचा भाजपचा दावा आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या अजून चार महत्त्वाचे मतदानाचे टप्पे बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर कालचं महाराष्ट्राचं यश हे भाजपचा हा दावा प्रबळ करणारं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच ओडिशा, महाराष्ट्रातल्या विजयाचा उल्लेख यूपीतल्या जाहीर सभेत केला. मायावतींनी मात्र स्थानिक निवडणुकांचं यश यूपीतल्या जनतेला सांगून मोदी दिशाभूल करत आहेत अशी टीका केली आहे. यूपीत आपला टिकाव लागू शकत नसल्याचं लक्षात आल्यानेच अशा स्थानिक विजयाची मदत घेण्याची वेळ पंतप्रधानांवर आली अशी टीका मायावतींनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement