एक्स्प्लोर
लालूंना हॉस्पिटलमध्येच विष देऊन जीवे मारण्याचा भाजपचा डाव, बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (राजद)प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे.

पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (राजद)प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे. राबडी देवी म्हणाल्या की, त्यांच्या पतीच्या जीवाला धोका आहे. भाजप सरकारचा लालूंना रुग्णालयात विष देऊन जीवे मारण्याचा डाव आहे. राबडी देवींनी ट्वीट केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारचा लालूंना रुग्णालयातच विष देऊन मारण्याचा कट आहे. परिवारातील कोणत्याही सदस्याला गेल्या काही महिन्यांपासून लालूंची भेट घेऊ दिलेली नाही. भारत सरकार वेडं झालं आहे. नियमांचं उल्लंघन करुन ते लोक लालूंना चुकीची वागणूक देत आहेत. त्यांच्यासोबत हुकूमशहाप्रमाणे वर्तन केले जात आहे. लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊ न शकलेल्या बिहार विधानसभेचे माजी अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनीदेखील सरकारवर आरोप केले आहेत. चौधरी म्हणाले की, कोणालाही लालूंची भेट घेऊ दिली जात नाही. लालूंविरोधात एक षडयंत्र रचले आहे. लालूप्रसाद हे सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे लालू यादव 1977 नंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहणार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी तुरुंगाबाहेर पडण्याची लालू प्रसाद यादव यांची इच्छा अपूर्ण राहिली आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालू यांनी प्रकृतीचे कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत कोर्टाने लालू यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
बीजेपी सरकार ज़हर देकर अस्पताल में लालू जी को मारना चाहती है। परिवार के किसी भी सदस्य को महीनों से मिलने नहीं दिया जा रहा है। भारत सरकार पगला गया है। नियमों को दरकिनार कर उपचाराधीन लालू जी के साथ तानाशाही सलूक किया जा रहा है।बिहार की जनता सड़क पर उतर गयी तो अंजाम बहुत बुरा होगा। pic.twitter.com/p51SoWT7Hg
— Rabri Devi (@RabriDeviRJD) April 20, 2019
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























