एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पंजाब आणि गोव्यासाठी भाजपची एकूण 46 जणांची यादी जाहीर

नवी दिल्ली: पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंजाबमध्ये जिथे भाजप 23 जागांवर विधानसभेची निवडणूक लढवत आहे त्यापैकी 17 जागांचा या यादीत समावेश आहे. तर दुसरीकडे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ही 29 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राज्यांसाठीची ही पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, पंजाबसाठी जाहीर झालेल्या यादीतील विद्यमान 12 आमदारांपैकी विद्यमान मंत्र्यांची नावे वगळण्यात आली आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये 4 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. भाजपने 23 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. तर इतर जागांवर भाजपचा सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दल निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेसोबतच अमृतसरमधील पोटनिवडणुकीसाठीही भाजपने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अमृतसरमधून भाजपने राजेंद्र मोहन चीना यांना पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांना काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडून पराभव सहन करावा लागला. यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने, या जागेसाठी पुन्हा मतदान होत आहे. सध्या काँग्रेसतर्फे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले जात आहे. गोव्यातील 40 जागांसाठी होणाऱ्या विधासभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजपने आज 40 पैकी 29 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यावेळी सेफ गेम खेळून 70 टक्के विद्यमान आमदारांनाच तिकीट वाटप केले गेले. यामध्ये 11 नव्या नावांचाही समावेश आहे. ज्यामध्ये मूरगावमधून संकल्प आमोंडकर, सावर्डेमधून शंकर किरलपालकर, सांगेमधून सावित्री कवळेकर यांचा समावेश आहे. राज्याचे विद्यमान क्रीडा मंत्री रमेश तावडेकर आणि विधानसभा अध्यक्ष अनंत शेठ यांच्या नावाची अद्यप घोषणा झाली नसली, तरी दुसऱ्या यादीत यांची नावे असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच विधासभेचे उपसभापती विष्णू वाघ यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांचे बंधू रामाराव वाघ यांवना सांत आंद्रेमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील भाजप उमेदवारांसाठी पक्षाच्यावतीने १५ जानेवारी रोजी पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Embed widget