एक्स्प्लोर

Citizenship Amendment bill | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन काही पक्ष पाकिस्तानची भाषा बोलतायेत : मोदी

गेल्या सहा महिन्यात आम्ही अनेक देशहिताचे निर्णय घेतले, ज्यासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे. आम्ही देशासाठी पाहिलेले सगळी स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन काही राजकीय पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. या विधेयकाच्या आधारे लाखो लोकांच्या जीवनात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अनेकांना समजून घ्यायची नाही. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. आम्ही तेच निर्णय घेतले ज्यासाठी आम्हाला जनतेनं निवडून दिलं. देशासाठी जगावं आणि देशासाठी मरावं, हे आमचं स्वप्न होतं. गेल्या सहा महिन्यात आम्ही देशासाठी पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकही ऐतिहासिक विधेयक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

लोकसभेत नागरिकत्व विधेयक मंजूर

लोकसभेत नागरिकत्व विधेयक मंजूर झालं आहे. लोकसभेत विधेयक मंजूर करुन घेणे भाजपला सोपं गेलं. लोकसभेत विधेयकाच्या बाजून 311 मतं तर विरोधात 82 मतं पडली. भाजपसह बीजेडी, एलजेपी, अकाली दल, जेडीयू, YSRCP, NDPP, MNF, NPF, NPP, PMK या पक्षांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. काँग्रेस, टीएमसी, डीएमके, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, एआयएम, सीपीआय, AIUDF, RSP, SKM या पक्षांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.

लोकसभेत मंजुरीनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर केलं जाणार आहे. राज्यसभेतील या विधेयकाचा मंजुरीचा मार्ग सोपा नसेल. या विधेयकावर चर्चेसाठी सहा तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. आज दुपारी दोन वाजता या विधेयकावर चर्चा सुरु होणार आहे.

शिवसेनेने भूमिका बदलली

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला काल पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही. तसेच राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर विस्ताराने चर्चा होणे अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं. नागरिकत्व विधेयकाबाबत काही प्रश्न आहेत. सरकारने सर्व शंकांचं निरसन करावं. चर्चेनंतर भूमिक स्पष्ट करु, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Husband wife died: पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेदरम्यान पती-पत्नीचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेदरम्यान पती-पत्नीचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंब्यात आज अंतिम निर्णायक सभा; मनोज जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार
मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज बीडच्या मांजरसुंब्यात अंतिम निर्णायक सभा; मुंबईला जाण्यापूर्वी मनोज जरांगे आंदोलनाची दिशा ठरवणार
Nanded Crime : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने रोखली बंदूक, पोलिसांकडून प्रत्युत्तर, नांदेड हादरलं!
नांदेड हादरलं! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने रोखली बंदूक, पोलिसांकडून प्रत्युत्तर
Supriya Sule & Sharad Pawar: 'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं', सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजपची टीका, म्हणाले, 'मौलाना शरद पवारांच्या...'
'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं', सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजपची टीका, म्हणाले, 'मौलाना शरद पवारांच्या...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Husband wife died: पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेदरम्यान पती-पत्नीचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेदरम्यान पती-पत्नीचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंब्यात आज अंतिम निर्णायक सभा; मनोज जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार
मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज बीडच्या मांजरसुंब्यात अंतिम निर्णायक सभा; मुंबईला जाण्यापूर्वी मनोज जरांगे आंदोलनाची दिशा ठरवणार
Nanded Crime : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने रोखली बंदूक, पोलिसांकडून प्रत्युत्तर, नांदेड हादरलं!
नांदेड हादरलं! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने रोखली बंदूक, पोलिसांकडून प्रत्युत्तर
Supriya Sule & Sharad Pawar: 'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं', सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजपची टीका, म्हणाले, 'मौलाना शरद पवारांच्या...'
'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं', सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजपची टीका, म्हणाले, 'मौलाना शरद पवारांच्या...'
Raj Thackeray VIDEO : मनसेची मतं चोरली, तपास झाला तर यांचा 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल; मतचोरीच्या वादात राज ठाकरेंची उडी
मनसेची मतं चोरली, तपास झाला तर यांचा 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल; मतचोरीच्या वादात राज ठाकरेंची उडी
Maharashtra Live: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे ठाणे रेल्वेस्थानकात हाल
Maharashtra Live: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे ठाणे रेल्वेस्थानकात हाल
VIDEO : ... तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावे लागेल; बाळासाहेब थोरातांना पुन्हा इशारा
... तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावे लागेल; बाळासाहेब थोरातांना पुन्हा इशारा
मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं भाजपचे षडयंत्र; वर्षा गायकवाडांचा आरोप
मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं भाजपचे षडयंत्र; वर्षा गायकवाडांचा आरोप
Embed widget