एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिद्धूचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, 'आप'मध्ये प्रवेश?
नवी दिल्ली : भाजपने शिफारस केलेले राज्यसभा खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांनी अडीच महिन्यातच राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
महत्त्वाचं म्हणजे सिद्धू हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
येत्या काही महिन्यात पंजाब विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू 'आप'मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी सिद्धूला डावलून अरुण जेटली यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळपासून सिद्धू नाराजा होता. मात्र राष्ट्रपती नियुक्त सदस्यत्वांद्वारे सिद्धूची नियुक्ती करुन भाजपने ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
दोन महिन्यांपूर्वीच राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपतींकडून 6 जणांची नियुक्ती केली होती. या सहा जणांमध्ये सिद्धूचा समावेश होता. मात्र आता सिद्धूने राजीनामा दिला आहे.
दरम्यान, संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासूनच सुरु झालं आहे. राज्यसभेच्या नवनियुक्त खासदारांनी आजचं शपथ घेतली. मात्र त्याचवेळी सिद्धूने मात्र राजीनामा दिला.
संबंधित बातम्या
डॉ. नरेंद्र जाधवांसह सहा जण राज्यसभेवर !
विनोद कांबळीचे सिद्धूबाबत वादग्रस्त ट्वीट, नंतर मागितली माफी!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement