(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Watch Alert : स्मार्ट वॉचनं हॉर्ट अटॅक येण्याअगोदर ॲलर्ट दिला, भाजप नेता सतर्क झाला अन् जीव वाचला
Smart Watch Alert : तेलंगाणाच्या सिरसिला येथील भाजप नेते प्रताप रामकृष्ण यांचा जीव स्मार्ट वॉचनं दिलेल्या ॲलर्टमुळं वाचला आहे.
हैदराबाद : भाजप नेत्याचा जीव एका स्मार्ट वॉच मुळं वाचला आहे. ॲपल कंपनीच्या स्मार्ट वॉचमुळं (Apple Smart Watch) तेलंगाणातील भाजप (BJP) नेत्याचा जीव वाचला आहे. भाजप नेते प्रताप रामकृष्ण (Pratap Ram Kirshna) असं त्यांचं नाव आहे. भाजप नेते प्रताप रामकृष्ण यांना ह्रदयविकाराचा धक्का येण्यापूर्वी स्मार्ट वॉचनं ॲलर्ट दिला होता.हा ॲलर्ट गंभीरपणे घेत प्रताप रामकृष्ण रुग्णालयात पोहोचले होते. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर प्रताप रामकृष्ण यांच्या ह्रदयात दोन ब्लॉकेज आढळून आले. यानंतर डॉक्टरांनी तातडीनं त्यांच्यावर उपचार केले. यामुळं भाजप नेते प्रताप रामकृष्ण बचावले.
डॉक्टरांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की प्रताप रामकृष्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचले नसते तर परिस्थिती गंभीर झाली असती. ॲपल वॉचमुळं जीव वाचल्याचं प्रताप रामकृष्ण म्हणाले. इथून पुढं कायम हे घड्याळ हातावर घालणार असल्याचं देखील ते म्हणाले.
तेलंगाणातील सिरसिला येथील भाजप नेते प्रताप रामकृष्ण नियमितपणे स्मार्ट वॉचचा वापर करतात. ॲपल वॉचची किंमत साधारण स्मार्ट वॉचपेक्षा महाग असल्यानं याच्या वापरकर्त्यांची संख्या कमी आहे.
प्रताप रामकृष्ण यांचं वय 62 वर्ष असून काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. छोटसं काम केलं किंवा थोडं चालल्यानंतर थकवा जाणवत होत. त्यांना डोकेदुखीचा देखील सामना करावा लागत होता. मात्र, प्रताप रामकृष्ण यांना गॅसेसचा त्रास होत असल्याचा संशय होता.
गेल्या सोमवारी सकाळी प्रताप रामकृष्ण मॉर्निंग वॉकला गेले होते . त्यावेळी व्यायाम करत असताना त्यांना डोकेदुखीचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी जे स्मार्ट वॉच घातलं होतं, त्यानं ॲलर्ट दिला. यानंतर प्रताप रामकृष्ण तातडीनं रुग्णालयात गेले आणि उपचार घेतले.
स्मार्ट वॉचवरील ॲलर्ट पाहून भाजप नेते प्रताप रामकृष्ण वारंगळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झालं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या ह्रदयातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या दोन गाठी झाल्याचं समोर आलं होत. यानंतर त्यांना हैदराबादमध्ये उपचार घेण्याबाबत सांगण्यात आलं. यानंतर रामकृष्ण हैदराबादला गेले. तिथं यशोदा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. यशोदा रुग्णालयात त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. रामकृष्ण यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. भाजप नेते प्रताप रामकृष्ण यांच्या कुटुंबीयांनी देखील स्मार्ट वॉचमुळं लवकर उपचार करण्यात मोठी मदत झाल्याचं म्हटलं.
संबंधित बातम्या :