एक्स्प्लोर

BJP Leader Monu Kalyane: भाजप युवा मोर्चाच्या नेत्याला गोळ्या झाडून भर चौकात संपवलं; हत्यारे फरार, परिसरात तणाव

BJP Leader Monu Kalyane: इंदूर विधानसभा क्रमांक 3 च्या राजकारणात हस्तक्षेप करणारे मोनू कल्याणे कैलाश विजयवर्गीय यांचे चिरंजीव माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जातात.

BJP Leader Monu Kalyane Shot Dead In Indore: नवी दिल्ली : भाजप (BJP) युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे (Monu Kalyane) यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशातील शहरातील एमजी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून पियुष आणि अर्जुननं मोनू कल्याणेवर गोळ्या झाडल्यात. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. 

इंदूर विधानसभा क्रमांक 3 मधील नेहमीच चर्चेत असणारं नाव म्हणजे, मोनू कल्याणे. मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयांमध्ये मोनू कल्याणे यांची वर्णी लागायची. दोघांनी मोनू कल्याणे यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी मोनू कल्याणे यांना मृत घोषीत केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू कल्याणे शनिवारी रात्रीपासून भगवा यात्रेच्या तयारीत होते. दरम्यान, पियुष आणि अर्जुन नावाचे दोन युवक दुचाकीवरून चिमणबाग चौकात पोहोचले. दुचाकीवरच बसून दोघेही मोनू कल्याणे यांच्याशी काहीतरी चर्चा करत होते. दरम्यान, दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुननं पिस्तुल काढून मोनू कल्याणे यांच्यावर गोळीबार केला आणि पियुषसह घटनास्थळावरून पळ काढला. चिमणाबाग चौकाचौकात उपस्थित असलेल्या मोनूच्या मित्रांवरही आरोपींनी गोळीबार केला, मात्र ते बचावले. कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदूर 3 विधानसभेचे माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांनी त्यांच्या समर्थकांसह मोनूच्या घरी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.  

मध्य प्रदेशातील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "ही अत्यंत दुःखद घटना आहे. मारेकऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मी प्रशासनाला केली आहे. मोनू कल्याण आमचा खूप चांगला कार्यकर्ता होते, तसेच ते पक्षाचे पदाधिकारीही होते. ज्यांनी मोनू यांचा खून केला, ते बहुधा त्यांचे शेजारी असल्याची माहिती मला मिळाली आहे. त्याच्या कौटुंबिक वादाबाबत मला माहिती नाही.". पुढे बोलताना इंदूरची कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित असल्याचं वर्णन करताना विजयवर्गीय म्हणाले, 'येथील कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. दहा-वीस खून झाले आहेत असं नाही. आता शेजाऱ्यानंच खून केला असेल तर याप्रकरणी पोलीस प्रशासन काय करू शकतं? पण याचा अर्थ शहरात टोळीयुद्ध सुरू आहे, असं होत नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget