(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP Announces Lok Sabha candidates : सुषमा स्वराज यांच्या लेकीला तिकिट, मालेगाव बाॅम्बस्फोटातील प्रज्ञा ठाकुरांचा पत्ता कट; शिवराजसिंहाना अब दिल्ली चलो!
मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना विदिशा आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना गुणातून उमेदवारी देण्यात आली आहे. विदिशा मतदारसंघ हा दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचा मतदारसंघ आहे.
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने आपल्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. यावेळी मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना विदिशा आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना गुणातून उमेदवारी देण्यात आली आहे. विदिशा मतदारसंघ हा दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचा मतदारसंघ आहे. मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपी आणि वादग्रस्त खासदार प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे.
BJP releases first list of 195 candidates for Lok Sabha elections pic.twitter.com/ms1zTtzLfL
— ANI (@ANI) March 2, 2024
दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्येला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP leader Alok Sharma to contest from Bhopal in Madhya Pradesh; Pragya Singh Thakur dropped https://t.co/rUFPYlxei0
— ANI (@ANI) March 2, 2024
तिकीटाच्या घोषणेनंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यांनी लिहिले की, पंतप्रधान मोदी हे युगाचे आणि दूरदर्शी आहेत. त्यांनी भारताचा अभूतपूर्व विकास करून लोककल्याणाचा इतिहास रचला. आता विकसित भारताचा संकल्पही त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल. हा संकल्प पूर्ण करण्यात गिलहरीसारखे योगदान देण्याची संधी मलाही मिळाली आहे. विदिशा लोकसभा मतदारसंघाशी माझे जवळचे नाते आहे. येथील जनतेने मला पाच वेळा खासदार म्हणून निवडून देऊन सेवेचे सौभाग्य दिले. पक्षाने पुन्हा एकदा याच कुटुंबाची सेवा करण्याची संधी दिली आहे.
#WATCH | Shivraj Singh Chouhan to contest from Vidhisha; Jyotiraditya Scindia to contest from Guna in Madhya Pradesh pic.twitter.com/L3PHSc0qv4
— ANI (@ANI) March 2, 2024
आदरणीय पंतप्रधान देशातील जनतेच्या हृदयात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप 400 हून अधिक जागा मिळवून सरकार स्थापन करेल. 'यावेळी पुन्हा मोदी सरकार' असा आवाज प्रत्येकाच्या हृदयातून येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जनतेची सेवा करण्यात मी कोणतीही कसर सोडणार नाही.
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी युगपुरुष और युगदृष्टा हैं। उन्होंने भारत का अभूतपूर्व विकास कर जनकल्याण का इतिहास रचा और अब विकसित भारत का संकल्प भी उनके ही नेतृत्व में पूरा होगा। इस संकल्प को पूरा करने में मुझे भी गिलहरी की तरह योगदान देने का अवसर मिला है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 2, 2024
विदिशा…
इतर महत्वाच्या बातम्या