8th December In History : बाळाजी बाजीराव, धर्मेंद्र आणि शर्मिला टागोरांचा जन्म, भारताच्या नेतृत्वात सार्कची स्थापना; आज इतिहासात
8th December In History : भारताच्या पुढाकाराने दक्षिण आशियायी देशांची संघटना म्हणजे सार्कची स्थापना करण्यात आली. त्यामाध्यमातून भारतीय उपखंडातील प्रश्न सोडवण्याचा निर्धार करण्यात आला.
8th December In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते. इतिहासात घडलेल्या घडामोडींचा भविष्यावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. आजच्या दिवशी नानासाहेब पेशना यांचा जन्म झाला. त्याशिवाय, बॉलिवूडचे अभिनेते हिमॅन धर्मेंद्र, अभिनेत्री शर्मिला टागोर यांचाही वाढदिवस आहे.
मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रमुख योद्धा असलेल्या नानासाहेब पेशवे म्हणजे बाळाजी बाजीराव यांचा आज जन्मदिन. त्यांच्याच काळात मराठ्यांची सत्ता उत्तर भारतात पसरली. तसेच बॉलिवूडसाठीही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्मदिनही आजच्याच दिवसाचा. या महत्त्वाच्या घटनांसोबतच इतिहासात आज कोणत्या इतर घटना घडल्या ते पाहुयात,
1720 : बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले.
पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्य देशभर पसरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण 1760 च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकत बनली. परंतु 1761 च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा पेशव्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्क्याने 23 जून 1761 रोजी नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला.
1935 : चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म (Dharmendra Birthday)
बॉलिवूडचे हिमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेद्र यांचा जन्मदिवस आहे. धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत 1960 मध्ये पदार्पण केले. जवळपास सहा दशकांपासून धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी जवळपास 250 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. धर्मेंद्र यांनी 1966 मध्ये रिलीज झालेल्या 'फूल और पत्थर' या चित्रपटातून अॅक्शन हिरो म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. यातच 'शोले' हा बॉलीवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. धर्मेंद्र हे बॉलिवूडमध्ये सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते.
1960 च्या दशकात 'आयी मिलन की बेला', काजल, फूल और पत्थर, आये दिन बहार के यासारख्या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्यांना लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्यांनी नंतरच्या वर्षांत मोठे स्टारडम मिळवले.
आंखे, शिकार, आया सावन झूम के, जीवन मृत्यु, तुम हसीन में जवान, शराफत, मेरा गाव मेरा देश, सीता और गीता, समाधी, राजा जानी, जुगनु, यादों की बारात, कहानी किस्मत की, लोफर, दोस्त, शोले, प्रतिज्ञा, चरस, धरम वीर, चाचा भतिजा, राम बलराम, काटिलों के काटिल, गज़ब, नौकर बीवी का, गुलामी, इन्सानियत के दुश्मन, लोहा, हुकुमत, आग ही आग, एलान-ए-जंग आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. बंदिनी, हकिकत, अनुपमा, सत्यकाम आणि चुपके चुपके या चित्रपटातील भूमिकाही गाजली.
1997 मध्ये त्यांना बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानासाठी फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला. 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1944: अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्मदिन (Sharmila Tagore Birthday)
शर्मिला टागोर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. शर्मिला टागोर यांनी आपल्या करिअरची सुरुवात सत्यजित रे यांच्या 'अपूर संसार' या बंगाली चित्रपटातून केली होती. यानंतर त्यांनी 'काश्मीर की कली'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्या शम्मी कपूरसोबत दिसल्या होत्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर त्यांनी 'वक्त', 'अनुपमा', 'देवर', 'अमर प्रेम', 'सफर', 'आराधना', 'मालिक', 'छोटी बहू', 'राजा रानी' असे अनेक हिट चित्रपट दिले. राजेश खन्ना व्यतिरिक्त शशी कपूरसोबत त्यांची जोडी अधिक पसंत केली गेली.
1985 : सार्क परिषदेची स्थापना (SAARC)
साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन ( SAARC) अर्थात दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना या संघटनेची स्थापना आहे. बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या दक्षिण आशियातील देशांची संघटना आहे. सार्क ही एक आर्थिक आणि भू-राजकीय संघटना आहे जी सामाजिक-आर्थिक विकास, स्थिरता आणि सदस्य राष्ट्रांमध्ये सामूहिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
या संघटनेत सुरुवातीच्या सदस्यांमध्ये भारत, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांचा समावेश होता. संघटनेच्या विस्तारामुळे यात अफगाणिस्तानला पूर्ण सदस्य म्हणून दर्जा मिळाला आहे. 2007 साली झालेल्या शिखर परिषदेत अफगाणिस्तानला हा दर्जा मिळाला.
दक्षिण आशियाई देशांचा आर्थिक विकास आणि क्षेत्रीय एकतेसाठी आणि दक्षिण आशिया देशात व्यापार सुलभ व्हावा यासाठी संघटन प्रयत्नशील असते. यासह सदस्य देशांमध्ये परस्पर सहकार्याने विकास साधने. यासह महिलांचे प्रश्न सोडवत त्यांचा विकास, व्यापारातील तांत्रिक अडथळे दूर करणे, सदस्य देशातील विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासासह परस्पर सहकार्यातून कृषी, औद्योगिक, आरोग्य क्षेत्र, क्रीडा, कला आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी काम करणे ही संघटनेची उद्दिष्ट्ये आहेत.
इतर महत्त्वाच्या घटना
1740 : दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.
1894 : पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म
1937 : भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
2004 : रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.
2004: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.
2013: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन
ही बातमी वाचा: