Bihar Politics : नितीश कुमार यांच्यासह भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता, या नावांची चर्चा
Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अद्यापही मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला नाहीये आणि त्यांनी आरजेडीमधून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणाही केली नाहीये. पण बिहारमध्ये सत्तापालट होण्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.
मुंबई : बिहारमध्ये (Bihar) सध्या राजकीय घडामोडींना बराच वेग आलाय. त्यातच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आजच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आलीये. तसेच नितीश कुमार (Nitish Kumar) हे आरजेडीची साथ सोडून भाजपमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करुन नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. याच वेळी नितीश कुमार यांच्यसह भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
पाटणामध्ये शनिवार 28 जानेवारी रोजी भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये नितीश कुमार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगण्यात आलं. पण अद्याप यावर कोणतंही शिक्कामोर्तब झालं नसून कोणत्याही प्रकारची घाई न करण्याचा पक्षाकडून घेण्यात आल्याचं आमदारांनी सांगितलं.
Bihar | A meeting of JD(U) MLAs and leaders of the party begins at the residence of CM Nitish Kumar in Patna.
— ANI (@ANI) January 28, 2024
भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी आग्रह?
बिहारमध्ये सुरु असलेल्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारी विनोद तावडे हे देखील शनिवार 27 जानेवारी रोजी बिहारमध्ये पोहचले होते. दरम्यान त्यानंतर भाजप आणि जेडीयूचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली होती. दरम्यान सध्याही भाजप मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद या दोन महत्त्वाच्या पदांसाठी आग्रही असल्याचं सागंण्यात येत आहे.
नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना
नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
इंडिया आघाडीसाठी पुढाकार नितीश कुमार यांनीच घेतला होता. पण आता नितीश कुमार हेच भाजपमध्ये सामील होणार असल्यामुळे इंडिया आघाडीच्या भवितव्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ही बातमी वाचा :