खबरदार! बिहार सरकार विरोधात आक्षेपार्ह लिहाल तर जेल जाल, नितीश कुमारांचा आदेश
सोशल मीडियात (Social Media) सरकार विरोधातील आक्षेपार्ह पोस्टवर बिहारमध्ये (Bihar) आतापर्यंत कोणतीही कारवाई केली जायची नाही. पण आता हे दिवस संपले असून सरकार विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण केल्यास तो गुन्हा ठरणार आहे. तसा सरकारच्या वतीनं आदेश काढण्यात आला आहे. (Nitish Kumar).
पटना: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सोशल मीडियावर आता वक्रदृष्टी पडली आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर केवळ टीका करणाऱ्या नितीश कुमारांनी आता त्या विरोधात कडक पाऊल उचलले आहे. बिहारमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारविरोधात काही आक्षेपार्ह लिखाण केल्यास तो गुन्हा ठरणार आहे. या प्रकरणी आता जेलची वारीही करावी लागण्याची शक्यता आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या अनेक भाषणामधून सोशल मीडियातील पोस्टवर टीका करतात. सोशल मीडीयाच्या माध्यमातून आपल्या सरकार विरोधात चुकीच्या आणि भ्रामक बातम्या तसेच अफवा पसरवल्या जातात असा आरोप त्यांनी अनेकदा केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे एक कारणही सोशल मीडियातील अफवा असे पक्षाकडून सांगण्यात येतंय.
तृतीयपंथींना पोलीस भरतीत संधी द्या! पाटणा उच्च न्यायालयाचा निकाल
बिहारमध्ये आता सरकार विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (Economic offence wing)चे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक नय्यर हसनेन खान यांनी सरकारच्या सर्व प्रधान सचिवांना याबाबत एक पत्र लिहलंय. या पत्रात असं सांगण्यात आलं आहे की, सरकारमधील पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केली जाते. त्यामुळे अशा लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. या पत्रात असंही सांगण्यात आलंय की सरकारचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार आणि सरकारच्या कोणत्याही विभागाचे प्रमुख यांच्याविरोधात सोशल मिडीयात आक्षेपार्ह लिखाण केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. बिहारमध्ये आर्थिक गुन्हे शाखा ही सायबर गुन्ह्यांशी संबंधित नोडल एजन्सी आहे.
दारु पिण्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक, 'हे' राज्य आहे प्रथम
आतापर्यंत बिहारमध्ये सोशल मीडियातील अशी आक्षेपार्ह लिखानावर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित कामगिरीमुळे आता मुख्यमंत्री नितीश कुमारांचे सोशल मीडियाबद्दल नकारात्मक मत तयार झाल्याचं सांगण्यात येतंय.
सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सडकून टीका केली आहे. तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांची भ्रष्टाचारी लोकांचे 'भिष्म पितामह' आणि 'गुन्हेगारांचे संरक्षक' अशी संभवना केली आहे. तेजस्वी यादवनी एका ट्वीटच्या माध्यमातून हे मत व्यक्त केलंय आणि आता यावर आपल्याला अटक करुन दाखवावी असे आव्हानही सरकारला दिलं आहे.
सलीम लालांचा 'हैदराबादी स्टाइल' पत्ता, सोशल मीडियावर होतोय व्हायरल