एक्स्प्लोर
भररस्त्यात महिलेचे कपडे फाडले, ओम स्वामींविरोधात दिल्लीत गुन्हा
नवी दिल्ली : बिग बॉसच्या दहाव्या पर्वातील स्पर्धक आणि अत्यंत वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ओम स्वामींच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. आपले कपडे फाडल्याच्या आरोपातून एका महिलेने दिल्ली पोलिसात ओम स्वामी आणि त्यांचा सहकारी संतोष आनंदविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ओम स्वामी आणि संतोष आनंद यांनी 7 फेब्रुवारीला आपल्यावर हल्ला करुन आपले कपडे फाडल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. दिल्लीतील राजघाट परिसरात सर्वांसमोर आपल्याला शिवीगाळ केली आणि मदतीसाठी आरडाओरडा करताच दोघांनी पोबारा केल्याचा दावा तिने केला आहे.
ओम स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्याविरोधात कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. दोघांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे, मात्र आरोपींची बाजू अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र यापूर्वीही दोघांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आहे.
स्वामी ओम यांना 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनलच्या स्टुडिओमध्ये त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही झाली होती. याआधीही स्वामी ओम यांनी सलमान खान आणि 'बिग बॉस'वर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
संबंधित बातम्या :
एड्स असल्याने सलमानने लग्न केलं नाही : स्वामी ओम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement