Crude Oil Prices : कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ! भारताला बसतोय दोन देशांच्या वादाचा फटका
भू-राजकीय परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होत असल्याचं दिसतंय आणि अशातच कच्च्या तेलाच्या किंमती 95 डॉलर प्रति बॅरलवर जाऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे भारताला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
![Crude Oil Prices : कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ! भारताला बसतोय दोन देशांच्या वादाचा फटका Big rise in crude oil prices! India is hit by a dispute between Russia and Ukraine Crude Oil Prices : कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ! भारताला बसतोय दोन देशांच्या वादाचा फटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/05/e2b09ee9ca766574b1f506830b9e7d53_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जागतिक स्तरावरील तेलाच्या भावात सातत्यानं वाढ होत असल्यानं भारतातील पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भू-राजकीय परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होत असल्याचं दिसतंय आणि अशातच कच्च्या तेलाच्या किंमती 95 डॉलर प्रति बॅरलवर जाऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे भारताला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
2014 सालानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. रशिया आणि यूक्रेनमधील वादाचे पडसाद जगभरातील बाजारपेठांवर दिसत आहेत. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव वधारण्याची शक्यता त्यामुळेच निर्माण झाली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन युक्रेनवर येत्या आठवड्यात आक्रमण करण्याचे आदेश देतील असा दावा व्हाईट हाऊसकडून करण्यात येत आहे. अमेरीका दबाव तंत्राचा वापर करत असल्यानं तेलाच्या किंमती वधारत असल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे, ओपेक देशांकडून उत्पादन वाढवण्यास कासवगतीने सुरुवात झाली खरी मात्र उत्पादन वाढल्यास देखील तेलाच्या किंमतींवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार नाही असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. ओपेक देशाची तेलाच्या उत्पादनाची मोठी ताकद आहे. मात्र तरी देखील त्यांच्याकडून उत्पादन लगेच मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत नाही आहे.
त्यामुळे भारतातील आरबीआयकडून देखील जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती 100 डॉलर्सच्यावर जाण्याचा अंदाज व्यक्त करताना चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांपासून भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र, निवडणुकांनंतर मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात जात आहे.
पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol Diesel Price Today) जाहीर केले आहेत. आजही इंधनाचे दर बदललेले नाहीत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच आजही भाव स्थिर आहेत. मात्र, पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Anil Ambani : अनिल अंबानी यांना मोठा झटका, सेबीने घातले कठोर निर्बंध
Health Tips : अनोशेपोटी खा मनुका, होतील 'हे' फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)