एक्स्प्लोर

Bhopal gas tragedy: पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचं निधन

गेल्या 35 वर्षांपासून भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झालं. मध्य प्रदेश सरकारने जाहीर केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भोपाळ : भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झालं. 2 डिसेंबर 1984 ला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे वायुगळतीची घटना घडली. यात कित्येक हजार लोकांचा मृत्यू तर, 1 लाखांपेक्षा अधिक लोक आजारी पडले होते. या पीडितांना कंपनीने केलेली मदत तुटपुंजी असल्याने अब्दुल जब्बार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून ते पीडितांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहिले. अब्दुल जब्बार यांच्यावर काही महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते स्वतः देखील भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडित होते. या घटनेत त्यांची 50 टक्के दृष्टी आणि फुफ्फुसातही संसर्ग झाला. जगभरातील औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा अपघातात याची गणना होते. कारण घटनेनंतरच्या आठ-दहा दिवसांत अडिच हजारांच्या वर माणसे मृत्युमुखी पडली. गेल्या 30 वर्षांत किती माणसे अपंग झाली अथवा जिवास मुकली त्याची गणनाच नाही. अब्दुल जब्बार यांनी पीडितांच्या न्याय हक्कासाठी भोपाळ गॅस पीडित उद्योग संघटना स्थापन केली. ही संघटना औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनेतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. गुरुवारी मध्य प्रदेश सरकारने अब्दुल जब्बार यांच्या होणाऱ्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा केली होती. ही मदत जब्बार यांच्यापर्यंत पोहचण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. भोपाळ वायुगळती दुर्घटना - मिक वायूचा वापर करुन सेविन हे कीटकनाशक त्या कारखान्यात तयार करण्यात येत होते. अपघाताच्या पूर्वी दीड महिना अगोदरपासून सेविनचे उत्पादन बंद करण्यात आले होते. मात्र, उरलेला 50 टनांपेक्षा अधिक वायू 2 टाक्यांमध्येच पडून होता. त्या टाकीत पाणी गेल्याने आतील मिक वायूचा दाब तीन किलोग्राम एवढा वाढला. परिणामी टाकीचे तापमान वाढल्याने तिच्यावरची सेफ्टी व्हाल्व्ह उघडली गेली आणि वायू बाहेर सुटला. यात अपरिमित मनुष्य व वित्त हानी झाली. त्यावेळी अपंग झालेले भोपाळमधील लोक आजही त्याचे परिणाम भोगत आहेत. कितीजणांना नुकसान भरपाई मिळाली ते माहीत नाही. कारखाना बंद पडल्याने लोकांच्या नोक‍ऱ्या गेल्या.

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget