एक्स्प्लोर

मोदी सरकारला संसद आणि संविधानाची गरज नाही; सोनिया गांधींचा घणाघात

भारत बचाव रॅलीदरम्यान केलेल्या भाषणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदी-शाह सरकारने संविधानाचा अपमान केला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतल्या रामलीला मैदानात काँग्रेसने भारत बचाव रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान घेतलेल्या सभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदी-शाह सरकारने संविधानाचा अपमान केला आहे. त्यांना देश चालवण्यासाठी संसद आणि संविधानाची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. देशात अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, आज देशातला तरुण बेरोजगार आहे. नोकरी मिळवण्यासाठी तो भटकतोय. गेल्या दशकांमध्ये अशी परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती. परंतु आता खूपच वाईट परिस्थिती आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. देशभरात महागाई खूप वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सामन्यांना जगणं मुश्किल होत आहे. देशाची परिस्थिती खूप गंभीर आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. तुम्हीदेखील घराबाहेर पडा, आंदोलन करा. आपल्याला देश वाचवायचा आहे. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. सोनिया म्हणाल्या की, मी जेव्हा शेतकरी बांधवांची अवस्था पाहते तेव्हा खूप त्रास होतो. त्यांना आपल्या शेतात योग्य वेळी पेरणीसाठी बियाणे मिळत नाहीत, त्यांना सहज खत मिळत नाही. पाणी आणि वीज उपलब्ध नाही. पिकांना हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी पिचला आहे. दुसऱ्या बाजूला कामगारांची अवस्थादेखील अशीच आहे. ते दिवसभर मजुरीमध्ये गुंतलेले असतात. ते पावसाळा, हिवाळा, उन्हाळ्याची पर्वा न करता काम करत राहतात. तरीही त्यांना 2 वेळची भूक भागवण्यासाठीचं अन्नधान्य खरेदी करता येत नाही. देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. मोदी सरकारची चुकीची धोरणं त्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे छोटे व्यापारीदेखील उद्ध्वस्त झाले आहेत. नवउद्योजक, व्यापाऱ्यांना कर्ज देण्यास बँका सक्षम नाहीत. नोकरी आणि पैशांअभावी संपूर्ण कुटुंबांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. परंतु ही परिस्थीती बदलण्यासाठी आपण एकत्र येऊन आंदोलन करायला हवे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Embed widget