एक्स्प्लोर
भय्यू महाराजांच्या मुलीचे सावत्र आईवर गंभीर आरोप
भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने सावत्र आईवर आरोप केले आहेत. कुहू ही भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवीची मुलगी आहे.
![भय्यू महाराजांच्या मुलीचे सावत्र आईवर गंभीर आरोप Bhaiyyu Maharaj suicide case: wife and daughter clash reason behind death? भय्यू महाराजांच्या मुलीचे सावत्र आईवर गंभीर आरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/13133626/Bhayyu-Maharaj-daughter-Kuhu.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
इंदूर: भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये तणावामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पत्नी आणि पहिल्या पत्नीची मुलगी यांच्यातील वादामुळे भय्यू महाराजांनी टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता आहे.
भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने सावत्र आईवर आरोप केले आहेत. कुहू ही भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवीची मुलगी आहे.
त्यांची दुसरी पत्नी आयुषी आणि कुहू यांच्यात अलबेल नव्हतं. भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर कुहूने आयुषी यांच्यावर आरोप केले आहेत.
सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप कुहूने केला आहे. तर कुहूला मी आवडत नसल्याने ती असे आरोप करत आहे, असं आयुषी यांचं म्हणणं आहे.
कुहू पुण्यात शिकते. त्यामुळे भय्यू महाराजांचं पुण्यात येणं-जाणं होत असे.
पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी 49 वर्षीय भय्यू महाराज यांनी ग्वाल्हेरमधील डॉ. आयुषी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं.
भय्यू महाराज यांची सुसाईड नोट
भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज दुसऱ्या पानावरील उल्लेख समोर आला आहे. यामध्ये त्यांनी आर्थिक कारभार सेवक विनायकने पाहावा असं म्हटलं आहे.
भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटबाबत मध्य प्रदेशचे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी मोठा दावा केला आहे.
माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं.
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर हा उल्लेख असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.
मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे.
भय्यूजींच्या पश्चात पत्नी आयुषी, मुलगी कुहू आणि आई कुमुदिनी असा परिवार आहे. पण या तिघांपैकी कुणालाही संपत्तीचे अधिकार दिले नाहीत, तर सेवेकरी असलेल्या विनायक यांना आश्रमाचं सर्व कामकाज आणि आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे भय्यू महाराजांनी असं का केलं हा प्रश्न पडलाय.
भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संबंधित बातम्या
आर्थिक कारभार सेवकाकडे द्या, भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान
भय्यू महाराज यांची संपत्ती किती?
भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं
मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि भय्यू महाराजांनी गोळी झाडली!
भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!
हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, भय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट
नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)