एक्स्प्लोर

बंगळुरु जगातील दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर, तर पुणे सहाव्या क्रमांकावर; टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सची यादी जाहीर

Bengaluru world’s Second Most Congested City: बंगळुरू जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक गर्दीचं शहर असून 29 मिनिटांत केवळ 10 किमी अंतर वाहनं पार करत असल्याचं टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्समधून समोर आलं आहे.

Bengaluru world’s Second Most Congested City: स्वच्छ, प्रदूषित आणि महागड्या शहरांनंतर आता ट्रॅफिकच्या आधारे जगातील 'टॉप स्लो शहरांची यादी' जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ब्रिटनची राजधानी लंडन पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारताचं आयटी हब बंगळुरू या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाची राजधानी दिल्ली 34 व्या क्रमांकावर आहे, तर मुंबईला लागून असलेलं पुणे शहर या यादीत 6 व्या क्रमांकावर आहे. मुंबईबद्दल बोलायचं तर मुंबई 47व्या क्रमांकावर आहे.

जगातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांची यादी डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉम (TomTom) यांनी प्रकाशित केली आहे. टॉमटॉम यांनी प्रकाशित केलेल्या ट्रॅफिक इंडेक्सनुसार, या यादीत बंगळुरु (Bengaluru) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर लंडन (London) पहिल्या क्रमांकावर आहे. 

ट्रॅफिकवर आधारित नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या टॉमटॉम या फर्मनं ही यादी जाहीर केली आहे. यादीनुसार, बंगळुरूमध्ये 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 29 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. दुसरीकडे पुण्याबद्दल बोलायचं झालं तर 10 किमी अंतर पार करण्यासाठी 27 मिनिटं, तर देशाची राजधानी दिल्लीत 22 मिनिटं आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 21 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. 

दिल्ली आणि मुंबई कितव्या क्रमांकावर?

सिटी सेंटर श्रेणीमध्ये, आयर्लंडमधील डब्लिन हे तिसरं सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर आहे. त्यानंतर जपानमधील सपोरो, इटलीमधील मिलान आणि भारतातील पुणे (6) या शहरांचा यादीत समावेश होतो. 15 ऑक्टोबर 2022 हा गेल्या वर्षभरात सिटी सेंटरमध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात वाईट दिवस होता. तर, 2021 मध्ये बंगळुरू हे दहावं आणि 2020 मध्ये सहावं शहर होतं. 

कोणतं शहरं कितव्या स्थानावर?

डच जिओलोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉम (TomTom Traffic Index) यांनी प्रकाशित केलेल्या ट्रॅफिक इंडेक्सनुसार, सिटी सेंटर (BBMP एरिया) श्रेणी 2022 मध्ये बंगळुरु हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं गर्दीचं शहर आहे. भौगोलिक स्थान तंत्रज्ञान तज्ञ टॉमटॉम यांनी केलेल्या सर्वेक्षणाने अहवाल प्रसिद्ध केला आहे की, गेल्या वर्षी हेव्ही ट्रॅफिकच्या वेळी बंगळुरु शहरातील 10 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 28 मिनिटं 9 सेकंद लागले. 35 मिनिटांचं समान अंतर कापण्यासाठी सरासरी वेळेसह लंडन पहिल्या क्रमांकावर आहे. तर, आयर्लंडची राजधानी डब्लिन, जपानमधील सपोरो शहर आणि इटलीचं मिलान अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. 

पेट्रोल, डिझेलच्या किमतींसह वाहन चालवण्यासाठी किती खर्च येतो. तसेच, इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी लागणाऱ्या चार्जिंगसह इतर पायाभूत सुविधांवरही या सर्वेक्षणात लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. दीर्घकाळ ट्रॅफिक जाममुळे वेळेचं होणारं नुकसान आणि कार्बन उत्सर्जन याचाही विचार हे सर्वेक्षण करताना करण्यात आला आहे. 

15 ऑक्टोबर 'हा' सर्वाधिक वाहतूक कोंडीचा दिवस

टॉमटॉमच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे की, बंगळुरू शहरातील 2022 मध्ये 15 ऑक्टोबर हा सर्वात व्यस्त रहदारीचा दिवस होता. त्या दिवशी, सिटी सेंटरमध्ये 10 किमी वाहनं चालवण्याचा सरासरी प्रवासाचा वेळ 33 मिनिटं 50 सेकंद होता. सर्वेक्षणातील डेटामधून समोर आलं की, बंगळुरूमध्ये 10 किमी प्रवास करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ 40 सेकंदांनी वाढला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, बंगळुरूमध्ये राहणाऱ्या लोकांनी सरासरी 260 तास (10 दिवस) ड्रायव्हिंग केलं आहे आणि 134 तास ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यापूर्वी, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनं सहा खंडांमधील 56 देशांतील 389 शहरांमधील माहितीचा अभ्यास केला.

2022 मध्ये कार्बन उत्सर्जन करणाऱ्या टॉप-5 शहरांमध्ये बंगळुरु पाचव्या स्थानावर

गेल्या वर्षी बंगळुरुमध्ये गर्दीच्या वेळी सरासरी 129 तास वाया गेले होते. या बाबतीत शहर टॉप-5 मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत, वाहतूक गर्दीच्या वेळी पेट्रोल कारमधून 974 किलो कार्बन उत्सर्जन करणारी वाहनंही शहरात दिसली. 2022 मध्ये सर्वाधिक कार्बन उत्सर्जन असलेल्या टॉप-5 शहरांमध्ये बंगळुरु पाचव्या स्थानावर आहे. टॉमटॉमच्या सर्वेक्षणात डिझेल कारमधून किती कार्बन उत्सर्जित झाला, याचा डेटा अद्याप उघड करण्यात आलेला नाही. 

मेट्रो क्षेत्र श्रेणीमध्ये, बोगोटा (Bogota) सर्वात जास्त गर्दीचं शहर आहे, त्यानंतर मनिला (Manila), सपोरो (Manila), लिमा (Lima), बंगळुरू (Bengaluru) (पाचव्या), मुंबई (Mumbai) (सहाव्या), नागोया (Nagoya), पुणे (Pune), टोकियो (Tokyo) आणि बुखारेस्ट (Bucharest) यांचा क्रमांक लागतो. 

जगातील सर्वाधिक गर्दीची शहरं

Rank  City Avg Travel Time Per Km Average Speed in Rush Hour
1 London 36 min 20s 14kmph 
2 Bengaluru 29 min 10s 18kmph 
3 Dublin 28 min 30s 17kmph 
4 Sapporo 27 min 40s 19kmph 
5 Milan  27 min 30s 18kmph 
6 Pune 27 min 20s 19kmph 
7 Bucharest 27 min 20s 17kmph 
8 Lima 27 min 10s  18kmph 
9 Manila 27 min 20kmph 
10 Bogota  26 min 20s 19kmph 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Embed widget