Bengaluru Rains : बंगळुरू महापालिकेने दर्शवला डेंजर झोन, पुरग्रस्तांसाठी धोक्याचा पूर्वसूचना
बंगळूरु : कर्नाटकातील बंगळुरू महानगरपालिकेने पुरग्रस्त लोकांना बुडण्यापासून वाचवण्यापासून आणि अतिवृष्टीदरम्यान दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. गेल्या वर्षी केआर सर्कल येथे एका पूरग्रस्त पूल ओलांडत असताना एका महिलेचा बुडून मृत्यू झाला होता.
बंगळूरु : कर्नाटकातील बंगळुरू महानगरपालिकेने पुरग्रस्त लोकांना बुडण्यापासून वाचवण्यापासून आणि अतिवृष्टीदरम्यान दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. गेल्या वर्षी केआर सर्कल येथे एका पूरग्रस्त पूल ओलांडत असताना एका महिलेचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान सरकारने या वर्षी मात्र सावध पाऊलं उचलत उपाययोजना सुरु केल्या आहेत. BBMP अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पूलांची धोका पातळी किती आहे? याबाबतची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. बंगळूरु शहरात एकूण 53 मोठे पूल आहेत. ज्यामध्ये 18 रेल्वेखालील पूलांचा समावेश आहे. त्यामुळे पूल ओलांडत असताना महापालिकेकडून पेंटच्या माध्यमातून धोका पातळी दर्शवण्यात येत आहे.
धोक्याची पातळी लाल रंगीत पेंटने दर्शवण्यात येत आहे
शहरातील पूलांच्या सुरक्षितेची पाहाणी आणि ऑडिट महापालिकेचे प्रमुख अभियंते बीएस प्रल्हाद यांनी केले होते. दुर्घटना कमी करण्यासाठी तीन प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणले गेले आहेत. पूलांच्या धोक्याची पातळी लाल रंगीत पेंटने दर्शवण्यात येत आहे. पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे, हे दर्शवण्यासाठी महापालिकेकडून रंग देऊन दर्शवण्यात आले आहेत. जेणेकरुन लोकांना पूलाखालून जाताना लक्षात येईल. पाण्याचा प्रवाह लोकांना समजावा यासाठी महापालिकेने सर्व नाले स्वच्छ केले आहेत. केआर सर्कल येथील पूल आणि कनिंगहॅम रोड ते कुमारा कृपा रोडपर्यंत उपाय योजना करण्यात आल्या आहेत. शिवाय ड्रेनेज क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त जाळी बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
पाणी पातळी समजण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे
पाण्याची पातळी समजण्यासाठी आणि धोक्याची पातळी समजावी यासाठी पूलांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. महापालिकेचे अधिकाऱ्यांचे पाणी पातळीवर निरिक्षण असणार आहेत. धोका जाणवल्यास अधिकाऱ्यांकडून त्वरित सूचना देण्यात येणार आहेत. शिवाय उपाय योजना करण्यासाठी शासनाकडून कडक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता
अरबी समुद्रातील चक्री वादळ आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे बेंगळुरूमध्ये पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळ शहरापासून सध्या तरी खूप दूर आहे. मात्र, बंगळुरुमध्ये हलक्या वादळ्यांसह पाऊस होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बंगळुरू हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी (दि.25) रोजी दिवसभर वीजेच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या