![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Belgaon : रुबेलाची लस घेतलेल्या तीन चिमुरड्यांचा मृत्यू
Rubella Vaccination : बेळगाव जिल्ह्यात रुबेलाची लस (Rubella Vaccination) घेतलेल्या तीन चिमुरड्यांचा (Three Children) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
![Belgaon : रुबेलाची लस घेतलेल्या तीन चिमुरड्यांचा मृत्यू belgaum three children suspiciously died after rubella vaccination Belgaon : रुबेलाची लस घेतलेल्या तीन चिमुरड्यांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/8b883c005b217193e886933371f14860_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rubella Vaccination : बेळगाव जिल्ह्यात रुबेलाची लस (Rubella Vaccination) घेतलेल्या तीन चिमुरड्यांचा (Three Children) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे लस घेतलेल्या अन्य बालकांच्या पलकात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावातील पवित्रा हुलगुर ,(13 महिने), मधु उमेश कुरगुंडी (14 महिने) आणि मल्लापुर गावातील चेतन (15 महिने) अशी मृत बालकांची नावे आहेत.
बेळगाव (Belgaon) जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील सालहळी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूबेलाची लस देण्यात आली होती. बारा जानेवारीला प्राथमिक आरोग्य केंद्रात रुबेलाची लस देण्यात आली होती. अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांनी बालकांना लस दिली होती. लस घेतल्यानंतर काही बालकांना उलटी, ताप असा त्रास सुरू झाला. याची माहिती आशा कार्यकर्त्यांना दिल्यावर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याचा सल्ला दिला.
लस घेतलेल्या जवळजवळ पंधरा बालकांना त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू केले. पाच जणांची अवस्था गंभीर झाल्यामुळे त्यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन बालकांचा मृत्यू झाला. एका बालकाची अवस्था गंभीर आहे. आणखी एका बालकाला रक्त देण्यात येत असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. बालकांना रुबेला लस प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली. तेथेच कोविडची दुसरी लसही नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे देखील मुलांचे आरोग्य बिघडले असण्याची शक्यता ग्राम पंचायत सदस्य भिमशी हादीमनी यांनी व्यक्त केली आहे. लस घेतलेल्या बालकांचा मृत्यू कसा झाला याची माहिती घेणार आहे, लस घेतलेल्या बालकांना ताप, उलट्या होवून मृत्यू झाला आहे, असेही भिमशी हादीमनी यांनी सांगितले.
संबधित बातम्या :
गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा, जनजागृती सुरु
गोवर, रुबेला लसीमुळे 29 विद्यार्थ्यांना रिअॅक्शन
गोवर आणि रुबेला लसीकरणानंतर तीन विद्यार्थिनींना रिअॅक्शन
गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा, जनजागृती सुरु
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)